शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

"गुन्हेगार सापडत नसतील तरच बक्षीस! नवीन पायंडे पाडू नका", पुणे पोलिसांच्या त्या निर्णयावर अजित पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 12:14 IST

पुणे पोलिसांवर राष्ट्रवादी नेते अजित पवारांची टीका...

पुणे /किरण शिंदे : एखादा गुंड अजिबातच सापडत नसेल तर त्याला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले जाते. वीरप्पन, चार्ल्स शोभराज सापडत नव्हते तेव्हा अशा प्रकारचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मात्र सरसकट बक्षीस जाहीर केले जात असेल तर पोलीस यंत्रणेपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. पोलिसांनी नवीन पायंडे पाडू नये असे सांगत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुणेपोलिसांच्या त्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. 

गुन्हेगाराला पकडणाऱ्या पोलिसांना बक्षीस देण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला होता. फरार असणाऱ्या, पाहिजे असणाऱ्या, शस्त्र बाळगणाऱ्या आणि सराईत गुंडांना पकडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पाच ते दहा हजार रुपये बक्षीस देण्याचे पुणे पोलिसांनी जाहीर केले होते. या निर्णयावर अजित पवारांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, एखादा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती अजिबातच सापडत नसेल तेव्हा त्याला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केलं जातं. मात्र सरसकट बक्षीस जाहीर होत असेल तर पोलीस यंत्रणे पुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. कायदा सुव्यवस्था राखणे आणि महिलांवर अत्याचार न होऊ देणे हे पोलिस यंत्रणेचे काम आहे. मात्र या कामासाठी त्यांना आमिष दाखवलं जात असेल तर हे योग्य नाही.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून, खबऱ्याच्या माध्यमातून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. नवीन पांडे पाडण्याची गरज नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी बक्षीस देण्याचा निर्णय का घेतला त्याची मी त्यांना विचारणा करणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPoliceपोलिस