जदोनांग यांना फाशी दिल्यानंतर जदोनांग यांनी बांधलेली मंदिरे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. सामान्य नागांना आपल्या सैन्यात अधिकारी नेमले. इंग्रजांना कर वसूल करणे अशक्य केले. गायडीनलु आता नागांचे आदरस्थान झाली होती. आता ती राणी गायडीनलू म्हणून ओळखली जाऊ लागली. १९३२ मध्ये आसाम रायफल्सच्या - उतर काचारमधील इंग्रज सैन्याबरोबर तिची लढाई झाली. आसाम मणिपूरच्या दुर्गम डोंगरी प्रदेशाचा फायदा घेत तिने गनिमी काव्याने युद्ध सुरु केले. अखेर इंग्रजांनी पुलोमी गावाला वेढा देऊन ७ आॅक्टोबर १९३२ रोजी राणीला पकडले. अवघ्या सतरा वर्षांच्या गायडीनलुला जन्मठेपेची शिक्षा झाली. तुरुंगातही तिने बेड्यांच्या आवाजाची संकेतभाषा तयार करून तुरुंगाबाहेर संदेश पाठवीत लढा चालूच ठेवला. १५ ऑगस्ट १९४७ भारताच्या स्वातंत्र्यदिवशीच तिची तुरुंगातून मुक्तता झाली. त्यानंतरही नागा लोकांची संस्कृती जपण्यासाठी तिचा लढा चालूच राहिला. स्वातंत्र्यानंतरही तिला भूमिगत व्हावे लागले. संपूर्ण आयुष्य नागा जमातीसाठी देणाऱ्या राणी गायडीनलु यांचे १७ फेब्रुवारी १९९३ रोजी यांचे निधन झाले.
प्रांतोप्रांतीचे क्रांतिकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:09 IST