महसुलात पालिका देशात अव्वल

By Admin | Updated: February 2, 2017 04:06 IST2017-02-02T04:06:16+5:302017-02-02T04:06:16+5:30

पुण्याच्या स्मार्टपणावर थेट देशाच्या आर्थिक पाहणी अहवालातच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या अहवालानुसार पुणे महापालिका महसूल जमा करण्यात देशात अव्वल आहे.

Revenue register tops in country | महसुलात पालिका देशात अव्वल

महसुलात पालिका देशात अव्वल

पुणे : पुण्याच्या स्मार्टपणावर थेट देशाच्या आर्थिक पाहणी अहवालातच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या अहवालानुसार पुणे महापालिका महसूल जमा करण्यात देशात अव्वल आहे. पायाभूत सुविधा देण्यामध्ये पुणे पालिकेला देशात दुसरा क्रमांक देण्यात आला आहे. पारदर्शी कारभारात मात्र पालिका देशात नववी आहे.
संसदेमध्ये सादर करण्यात आलेल्या केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालात याचा ठळक उल्लेख करण्यात आला आहे. देशातील २१ महापालिकांचे सर्वेक्षण या अहवालासाठी करण्यात आले. त्यामध्ये महसूल जमा करण्यात पुणे महापालिकेला देशात पहिले स्थान देण्यात आले आहे. पुण्याच्या जोडीला हैदराबाद महापालिका आहे. पायाभूत सुविधा देण्यामध्ये पुणे महापलिका दुसऱ्या क्रमाकांवर आहे. हैदराबाद पहिल्या, तर चंदीगड तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Web Title: Revenue register tops in country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.