शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

'धर्म परिवर्तन करताना येशूचे रक्त प्या...' आळंदीत धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 18:02 IST

अनेकांनी तो द्राक्षाचा रस असून प्यायल्याचे म्हंटले आहे

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने धर्म परिवर्तन करताना येशूचे रक्त प्या असे सांगून लाल रंगाचे द्रव्य कुटुंबाला दिले असल्याचे समोर आले आहे. याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी उद्धव कांबळे (वय ४८ वर्षे, रा. पद्मावती रोड, आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुधाकर सूर्यवंशी व इतर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या परिसरात राहणाऱ्या महादेव गवळी यांच्या घरी गेले असता त्यांनी पाहिले, की एका महिला त्या घरातील लोकांना छोट्या ग्लासमधून लाल रंगाचे द्रव्य हे येशूचे रक्त असल्याचे सांगत होती. व त्यांना ते प्यायला सांगत होती. अनेकांनी तो द्राक्षाचा रस असून प्यायल्याचे म्हंटले आहे. तसेच, धर्म परिवर्तनाबाबत विचारले असता, त्याबाबत आमची चौकशी सुरु आहे असे त्यांनी सांगितले.

या धर्म परिवर्तन करण्याच्या प्रयत्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका महिलेने हातात ट्रे घेतला असून त्यामध्ये पाच ते सहा छोटे ग्लास आहेत. या ग्लासमध्ये लाल रंगाचे द्रव्य आहे. ती महिला ते द्रव्य घरातील महिला व व्यक्तींना ते येशूचे रक्त असल्याचे सांगून त्यांना प्यायला सांगत असल्याचे दिसून येत आहे.

जिथे समाधीस्थ विश्वाची माऊली... तिथेच धर्माची काहीली..गेल्या काही दिवसापासून तीर्थक्षेत्र आळंदी आणि परिसरात धर्मांतर करणाऱ्या टोळीचा सुळसुळाट झाला आहे. आळंदीत सारख्या पावन भूमीत या टोळीत लोक भोळ्या भाबड्या लोकांना येशूचे रक्त पाजून त्यांचे सगळे रोग, आजार आणि कष्ट संपतील म्हणत हिंदूंचे धर्मांतरण करत आहेत. समाजात अंधश्रद्धा पसरवत आहेत. याविषयी आळंदी शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाPoliceपोलिस