शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा बांधवावरील गुन्हे विनाशर्त मागे घ्या :  मराठा क्रांती मोर्चाची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 17:06 IST

खेड तालुक्यात ३० जुलै २०१८ रोजी मराठा मोर्चाला हिंसक वळण लागल्याने त्यातील काही मराठा समाजातील आंदोलन कर्त्यांना अटक करण्यात आली.

ठळक मुद्दे३० जुलै २०१८ रोजी खेड तालुक्यातील मराठा मोर्चाला हिंसक वळण काही मराठा समाजातील आंदोलन कर्त्यांना अटक अद्याप राज्यभर मराठा बांधवांचे अटक सत्र सुरू

पुणे : मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलना दरम्यान राज्यातील मराठा समाज बांधवावरील दाखल गुन्हे विनाशर्त मागे घ्या. अशी मागणी शासनाकडे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली. पुढील सात दिवसांच्या आत हे गुन्हे मागे न घेतल्यास १६ डिसेंबर पासून चाकण येथे आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. मराठा मोर्चाचे पदाधिकारी मनोहर वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ३० जुलै २०१८ रोजी खेड तालुक्यातील मराठा मोर्चाला हिंसक वळण लागल्याने त्यातील काही मराठा समाजातील आंदोलन कर्त्यांना अटक करण्यात आली.काही समाजकंटकांनी मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी हिंसाचार घडवून आणला. त्या दंगलीचा ठपका हा मराठा युवकांवर ठेवण्यात आला. यामुळे त्यांना अटक करण्यात आली. अद्याप राज्यभर मराठा बांधवांचे अटक सत्र सुरू आहे. याविषयी अनेकदा शासनाला सातत्याने निवेदन देऊन देखील शासनस्तरावरून कुठल्याही प्रकारचा आदेश आला नसल्याचे वाडेकर यांनी सांगितले. खऱ्या दोषी असलेल्यावर कारवाई करा. मात्र राजकारण करून मराठा युवकांना वेठीस धरू नये. आतापर्यत २०० पेक्षा जास्त मराठा युवकांना अटक करण्यात आली असून दोन दिवसांपूर्वी २३ मराठा युवकांना अटक करण्यात आल्याचे भगवान पाटील यांनी सांगितले. खेड तालुक्याचे आमदार सुरेश गोरे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली. त्यात त्यांनी खेड येथील मराठा मोर्चा प्रकरनाचा तपास एस आयटी मार्फत व्हावी. अशी मागणी केली. यामुळे शांत झालेल्या वातावरण पुन्हा पेटले गेले. याचा त्रास मात्र निष्पाप मराठा युवकांना सहन करावा लागला. स्थानिक आमदार यांच्या अशाप्रकारच्या राजकारणाचा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारयांनी निषेध केला. 

टॅग्स :PuneपुणेMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाPoliceपोलिस