शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या सभेदरम्यान सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाचा अपघात; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 15:18 IST

डोक्याला मार लागल्याने पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाले होते

पुणे : पुण्यात काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा सुखरूप पार पडला. पुणेकरांनीहीपोलिसांना सहकार्य केल्याचे  दिसून आले. या दरम्यान भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते यांचेही सहकार्य लाभले. अशातच शिवाजीनगर येथे झालेल्या अपघातात सेवानिवृत्त पोलीस गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी तत्परता दाखवून शिंदे गटाच्या सुधीर जोशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी  पोलिसाचे प्राण वाचवले आहेत. 

पंतप्रधान मोदी यांच्या पुणे मेट्रो उदघाटन सोहळ्याला वडगावशेरी मतदार संघातील भाजपा ज्येष्ठ नागरिक आघाडीचे उपाध्यक्ष, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल सुर्वे आले होते. ते कार्यक्रमस्थळी रस्ता ओलांडत असताना कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने त्यांना जोरदार धडक दिली. त्याचवेळी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी प्रमुख सुधीर जोशी आसनव्यवस्थेकडे जात होते, त्यांनी अपघात बघता क्षणी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत, विठ्ठल सुर्वे यांना वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी प्रयत्न सुरू केले. त्या ठिकाणी कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने होते. 

मात्र कर्तव्यावर नियुक्त असल्याने ते त्यांना मदत करण्यास असमर्थ होते. या संकटावर मात करत जोशी आणि त्यांच्या टिमने वेगाने हालचाली करत त्यांना खासगी वाहनाने रुग्णालयात दाखल केले. तज्ञ डॉक्टरांशी संपर्क करीत त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. सुर्वे यांच्या मेंदूला मार बसल्याने वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्याने सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल सुर्वे यांचे प्राण वाचले. यावेळी आशुतोष शेंडगे, ऋषिकेश गोसावी, उपशहरप्रमुख सुधीर कुरूमकर यांनीही तातडीने मदत केली. सध्या त्यांच्यावर संचेती रूग्णालयात आयसीयू कक्षात उपचार सुरू असून, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे आणि एकनाथ शिंदे सोशल फाउंडेशनतर्फे त्यांच्या उपचारासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदेPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल