मुख्याध्यापक साठे व उबाळे सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:09 IST2021-06-20T04:09:37+5:302021-06-20T04:09:37+5:30

शिस्तप्रिय व विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन केले. प्रशासनाच्या उच्च पदावर अधिकारी, ...

Retired headmaster Sathe and Ubale | मुख्याध्यापक साठे व उबाळे सेवानिवृत्त

मुख्याध्यापक साठे व उबाळे सेवानिवृत्त

शिस्तप्रिय व विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जन केले. प्रशासनाच्या उच्च पदावर अधिकारी, उद्योजक शेतकरी म्हणून राज्यातील विविध ठिकाणी त्यांच्या विद्यार्थ्यांनी नाव कमावले आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचे पुण्यातील विद्यार्थ्यांनी खास उपस्थित लावली. त्यांच्या निवृत्तीनिमित्त विद्यार्थिनी रूपाली गोगाव (पूजा गोगावे) यांनी शब्दांकन केलेले मानपत्र, पुणेरी पगडी, उपरणे देऊन त्यांचा विद्यार्थ्यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. शाळेचे नूतन मुख्याध्यापक सुभाष भिमणवरू यांच्या हस्ते शिक्षकांच्यावतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्रीमंत व्हनकडे हे होते.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत भिमणव, ज्येष्ठ संचालक विश्वनाथ भिमणवरू, माजी विद्यार्थी अकॅडमीचे आनंदराव पाटील, रेणुका कोळी, निताराणी गायकवाड, राणी स्वामी, अजेय म्हेत्रे, रेवन, बसू बडरे, म्हेत्रे, निर्मला कोरे-ख्याडे, सविता भिमणवरू, जीतू गुरव, पारू अचलेरे, मोरे पाटील, दाजी माने, शशिकांत उपासे, शिवराया नेल्लूरे, मुख्याध्यापक सिद्राम खट्टे, अशोक बोधलेसर यांनी सत्कार केला. सूत्रसंचालन विजय बाळगी यांनी केले. शिलेणी यांनी आभार मानले.

--

१९ फोटो क्रमांक : १९ पुणे शिक्षक निवृत्त

Web Title: Retired headmaster Sathe and Ubale