शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

सेट परीक्षेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 5:25 AM

एकूण ४ हजार ६७ विद्यार्थी पात्र ठरले असून, परीक्षेचा निकाल ६.५२ टक्के लागला आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या सहायक प्राध्यापक पदांसाठीच्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल गुरुवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. एकूण ४ हजार ६७ विद्यार्थी पात्र ठरले असून, परीक्षेचा निकाल ६.५२ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात २.६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.महाराष्ट्र व गोव्यामध्ये दि. २८ जानेवारी रोजी सेट परीक्षा घेण्यात आली. दोन्ही राज्यांतून एकूण ६२ हजार ४०४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यांपैकी ४ हजार ६७ विद्यार्थी सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले आहेत. मागील वर्षी या परीक्षेचा निकाल ३.९२ टक्के लागला होता. या वर्षी त्यामध्ये २.६० टक्क्यांची वाढ झाली असून ६.५२ टक्के उत्तीर्णतेची टक्केवारी आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षेचा पॅटर्न बदलल्याने निकाल वाढला आहे.परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ६ टक्के विद्यार्थी पात्र करण्याचे धोरण स्वीकारले आहे. तसेच, तिन्ही पेपरना उत्तीर्णतेची अट बदलण्यात आली असून सरासरी उत्तीर्णतेएवढे गुण मिळविणे आवश्यक आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे.

टॅग्स :examपरीक्षा