सुप्यात शिवभोजन थाळी उपक्रमास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:12 IST2021-06-09T04:12:47+5:302021-06-09T04:12:47+5:30
या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. सर्व नियमांचे पालन करून शिवभोजन ...

सुप्यात शिवभोजन थाळी उपक्रमास प्रतिसाद
या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. सर्व नियमांचे पालन करून शिवभोजन थाळीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती वसंत गावडे यांनी केले.
शिवभोजन थाळी १४ जून २०२१ पर्यंत मोफत देण्यात येणार असून त्यानंतर संबंधित व्यक्तीला ५ रुपयात देण्यात येणार असल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
याप्रसंगी बाजार समितीचे संचालक शौकत कोतवाल, विठ्ठल खैरे, बाळासाहेब पोमणे, शशिकला वाबळे, सुनील पवार, जे. पी. जगताप, रत्नाबाई चौधरी, माजी सभापती पोपट पानसरे, संजय पोमण, संपत जगताप, ज्ञानेश्वर कौले, अनिल हिरवे, बी. के. हिरवे, मल्हारी खैरे, मुनिर डफेदार आदी उपस्थित होते.