पार्किग शुल्काला संस्थाचालकांचा विरोध

By Admin | Updated: December 11, 2014 00:39 IST2014-12-11T00:39:35+5:302014-12-11T00:39:35+5:30

संस्थांनी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंजूर केलेल्या पार्किग शुल्काची अंमलबजावणी तत्काळ करावी, असे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

Resistance of parking fees to institutional operators | पार्किग शुल्काला संस्थाचालकांचा विरोध

पार्किग शुल्काला संस्थाचालकांचा विरोध

पुणो : सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्थांनी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंजूर केलेल्या पार्किग शुल्काची अंमलबजावणी तत्काळ करावी, असे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. परंतु, कोणतीही पूर्वकल्पना न देता विद्यापीठाला महाविद्यालयांवर अशा पद्धतीने जबरदस्ती करता येणार नाही. त्यामुळे शुल्क नियमावलीची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून करावी, अशी मागणी संस्थाचालकांकडून केली जात आहे.
विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांकडून पार्किग शुल्काच्या नावाखाली विद्याथ्र्याची लूट केली जाते. त्यामुळे विद्यापीठाने या संदर्भात लक्ष द्यावे, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटनांनी केली होती. त्यानुसार विद्यापीठाने कला शाखेचे अधिष्ठाता डॉ. अशोक चासकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापन केली. समितीने दिलेल्या शुल्कनिश्चिती नियमावलीच्या अहवालास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. परंतु, या नियमावलीची अंमलबजावणी तत्काळ करण्याचे परिपत्रक विद्यापीठाच्या नियोजन व विकास विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सायकलसाठी व अपंग विद्याथ्र्याकडून पार्किग शुल्क आकारू नये, दुचाकी वाहनतळ शुल्क माफक असावे; परंतु त्याचे स्वरूप व्यावसायीक नसावे. वाहनतळाची दैनंदिन स्वच्छता करावी, पावसाळी पाणी, वाहनांची व्यवस्था करावी, वाहनतळातील फरशांची डागडुजी करावी. दुचाकी गाडय़ा वाहनतळावर व्यवस्थितपणो लावण्यासाठी रंगांच्या पट्टय़ांची आखणी करावी. तसेच, वातनतळावर प्रकाशव्यवस्था करून नियमावलीचे सूचनाफलक लावावेत. विद्याथ्र्याना पार्किगचा मासिक पास उपलब्ध करून द्यावा, मासिक पासची रक्कम 5क् रुपये असावी. 
वार्षिक पाससाठी 5क्क् रुपये आकारावेत. सहामाही पाससाठी 3क्क् रुपये आकारावेत. मासिक पास न घेणा:या विद्याथ्र्याकडून दररोज 3 रुपये पार्किग शुल्क आकारावे. तर, महाविद्यालयास भेट देणा:या व्यक्तीकडून 1क् रुपये शुल्क घावे. चारचाकी वाहनांसाठी पार्किगची व्यवस्था करू नये. 
पार्किगच्या जागेवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत. जी महाविद्यालये शहराच्या मध्यवस्तीत तसेच गर्दीच्या ठिकाणी आहेत अशा महाविद्यालयांनी वारंवार होणारी गर्दी जागेचा अभाव वाहतूककोंडी या सर्व बाबींचा विचार करून स्वत:च्या अधिकारात पार्किगबाबत निर्णय घ्यावा, अशी नियमावली विद्यापीठाने प्रसिद्ध केली आहे. (प्रतिनिधी)
 
अंमलबजावणीची सक्ती नको
4विद्यापीठाने नियमावली प्रसिद्ध करून तिची अंमलबजावणी तत्काळ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, एकाही महाविद्यालयाला अचानक या नियमावलीची अंमलबजावणी करणो शक्य होणार नाही. विद्यापीठानेसुद्धा महाविद्यालयांना या नियमावलीच्या अंमलबजावणीची सक्ती करू नये, अशी भूमिका शिक्षणक्षेत्रतून व्यक्त केली जात आहे.
 
बहुतांश सर्व महाविद्यालयांनी सध्या खासगी कंत्रटदारांकडे पार्किगची व्यवस्था दिली आहे. तसेच, त्यांच्याबरोबर लेखी करार केला आहे. त्यामुळे विद्यापीठाला महाविद्यालयांवर अचानक नियमावली लादता येणार नाही. नियमाप्रमाणो विद्याथ्र्याच्या शैक्षणिक शुल्कातून पार्किगचे शुल्क जमा करण्यासाठी महाविद्यालयांना अवधी देणो आवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठाने पार्किग नियमावलीची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षात सुरू करण्याबाबत महाविद्यालयांना सूचना करावी.
- डॉ. गजानन एकबोटे, कार्याध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी

 

Web Title: Resistance of parking fees to institutional operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.