शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पिण्यासाठी धरणे राखीव

By admin | Updated: August 23, 2015 04:16 IST

पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी तूट आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपलब्ध असलेला पाणीसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच प्राधान्य

पुणे : पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी तूट आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपलब्ध असलेला पाणीसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच प्राधान्य देऊन राखीव ठेवण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे स्पष्ट केले. दरम्यान, हाताशी आलेले खरिपाचे पीक वाया जाऊ नये यासाठी शेवटचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.जिल्ह्यात धरणांतील पाणी साठ्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या धरणांमध्ये आलेल्या पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी बापट यांनी संबंधित सर्व लोकप्रतिनिधीच्या उपस्थित तातडीने कालवा समितीची बैठक घेतली. बैठकीला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, दोन्ही महापालिकांचे महापौर, आयुक्त, संबंधित सर्व आमदार, खासदार उपस्थित होते. या वेळी जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुठा खोऱ्यात ४१ टक्के, नीरा खोऱ्यात १३ टक्के, पवना प्रकल्पात ३ टक्के आणि कुकडी खोऱ्यात तब्बल ५६ टक्के पाणीसाठ्यात तूट असल्याचे निदर्शनास आणून दिले. पावसाची हीच स्थिती कायम राहिल्यास आगामी पावसाळ््यापर्यंत म्हणजे १५ जुलै २०१६ पर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन सर्व पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याची आवश्यकता आहे. तसेच पिण्याचे पाणीदेखील काटकसरीने वापर करून पाणीवापरावर मोठ्या प्रमाणात निर्बंध आणण्याची आवश्यकता असल्याचे बापट यांनी सांगितले.बापट यांनी सांगितले, की पावसाचे नैसर्गिक संकट लक्षात घेता पाणीवाटप करताना शहरी-ग्रामीण वाद न करता शेतकरी, उद्योग आणि पिण्यासाठी पाणी या सर्वांचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार सध्या हाताशी आलेले खरिपाच्या पिकासाठी शेवटचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. हे आवर्तन सुरू असताना कॅनॉल लगतच्या विहिरी व साठवण तलाव भरून घेणे, मोठ्या प्रमाणात कॅनॉल दुरुस्ती करणे, बेकायदा पाणी उपशावर कारवाई करण्याचे आदेश बापट यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने जलसंपदाच्या विभागाने भरारी पथकांची नियुक्ती करून कारवाई चे आदेशही बापट यांनी दिले. (प्रतिनिधी)कृत्रिम पावसाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा राज्यात विविध ठिकाणी कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयोग सुरू असून, सध्या पुण्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे पुण्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.