शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकांवरही करता येणार आरक्षण, तिकीट खिडक्या उघडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 15:52 IST

पुण्यासह चिंचवड, तळेगाव व बारामती रेल्वे स्थानकातील प्रत्येकी एक खिडकी सुरू

ठळक मुद्देरेल्वे मंत्रालयाने दि. १ जूनपासून देशभरात २०० रेल्वेगाड्या सुरू करण्याचा घेतला निर्णय मध्य रेल्वेच्या पुणे विभागात ११ तिकीट खिडक्यांवर आरक्षणाची सुविधा उपलब्ध

पुणे : लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर १ जूनपासून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या आरक्षणासाठी मोजक्या रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्या उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पुणे रेल्वे स्थानकांवर तीन तिकीट खिडक्या उघडण्यात आल्या असून तिथे आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुण्यासह चिंचवड, तळेगाव व बारामती रेल्वे स्थानकातील प्रत्येकी एक खिडकी सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.रेल्वे मंत्रालयाने दि. १ जूनपासून देशभरात २०० रेल्वेगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातून केवळ दानापुर ही एकच थेट गाडी असेल. मात्र मुंबईतून सुटणाऱ्या पाच एक्सप्रेस पुणे मार्गे धावणार आहेत. सुरूवातीला रेल्वेने आरक्षण केवळ ऑनलाईन माध्यमातूनच करता येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार गुरूवारी पहिल्याच दिवशी आरक्षणाला मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र, ऑनलाईन आरक्षण न करता येऊ शकलेल्या नागरिकांसाठी स्थानकांवरील आरक्षण खिडक्या उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मध्य रेल्वेच्या पुणे विभागात ११ तिकीट खिडक्यांवर आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पुणे रेल्वे स्थानकावर तीन खिडक्या उघडण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यात बारामती, तळेगाव, चिंचवड या स्थानंकावर प्रत्येकी एक खिडकी असेल. तर कोल्हापुर, मिरज, सांगली, सातारा व कराड येथेही प्रत्येकी एक खिडकी खुली राहणार आहे. दरम्यान, आरक्षण खिडकीबाहेर सुरक्षित अंतरासाठी चौकोन करण्यात आले आहेत. त्या चौकानामध्ये उभे राहावे लागणार आहे. तसेच तोंडाला मास्क लावणेही बंधनकारक करण्यात आले आहे. शुक्रवारी तिकीट खिडक्या उघडण्यात आल्या असल्या तरी तुरळकच प्रवासी होती. अनेक जण आॅनलाईन आरक्षणालाच पसंती देत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार