शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

‘पार्किन्सन’ आजारावर संशोधन! आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 11:43 PM

अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा... जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण... मोठ्या भावाने केलेली मजुरी... आई-वडिलांनी केलेली आर्थिक मदत या सर्वांच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणाने ‘पार्किन्सन’ या आजारावर संशोधन केले.

- रविकिरण सासवडेबारामती - अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा... जिल्हा परिषद शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण... मोठ्या भावाने केलेली मजुरी... आई-वडिलांनी केलेली आर्थिक मदत या सर्वांच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणाने ‘पार्किन्सन’ या आजारावर संशोधन केले. भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (आयआयटी) या संस्थेतून पीएच.डी.ची पदवी प्राप्त करून ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिळविली. या तरुणाच्या संशोधनाची दखल थेट स्वीडन देशाने घेतली असून, त्यांंना पुढील संशोधनासाठी आमंत्रित केले आहे.गणेश मारुती मोहिते (रा. कळंब, ता. इंदापूर) असे या कर्तबगार तरुणाचे नाव आहे. मोहिते यांची पावणेतीन एकर जमीन आहे. या जमिनीतून मिळणाºया अल्प उत्पन्नावर त्यांनी मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. अरुण व गणेश या त्यांच्या मुलांनीही आई-वडिलांच्या कष्टांचे चीज करायचे ठरवले. गणेश हे अभ्यासात नेहमी पुढे असायचे. महाविद्यालयीन शिक्षणासाठी मोठा खर्च होऊ लागल्यानंतर मोठे बंधू अरुण यांनी शिक्षण सोडून दुसºयाच्या शेतात मजुरी सुरू केली; मात्र गणेश यांना शिक्षणापासून दूर जाऊ दिले नाही. गणेश यांनीदेखील बँकेकडून कर्ज घेऊन शिक्षण सुरू ठेवले.दरम्यान, घरी दुग्धव्यवसाय व शेतीकामामध्ये ते मदत करीत असत. त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण वालचंदनगर येथील वर्धमान विद्यालयात, तर महाविद्यालयीन शिक्षण बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातून पूर्ण केले. तर, पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुणे येथील मॉडर्न महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. त्यांनी सेट, नेट या परीक्षा अगदी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्या. त्यामुळे त्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती मिळू लागली. त्यांनी पीएच.डी.साठी आयआयटी मुंबई या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळविला. त्यांच्या संशोधक वृत्तीला या संस्थेत खरी दिशा मिळाली. ‘नोकरी मिळविण्यासाठी शिक्षण घ्यायचे नव्हते, तर आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात काही तरी भरीव कार्य करायला हवे. या भावनेतूनच मी शिकत राहिलो, असे गणेश सांगतात. मोहाली (पंजाब) येथे ६ महिन्यांपूर्वी परिसंवादाला १२७ देशांचे संशोधक उपस्थित होते. या परिसंवादात त्यांनी केलेल्या ‘पार्किन्सन रोगाशी निगडित आनुवांशिक उत्परिवर्ती अल्फा सायनुक्लिन प्रथिनावरील अभ्यास’ या संशोधनाला ‘बेस्ट पोस्टर’ पुरस्कार मिळाला. संशोधनाची दखल स्वीडन देशातील ‘लिकोपिंग’ विद्यापीठाने घेतली व पुढील संशोधनासाठी स्वीडनमध्ये आमंत्रित केले....असे आहे संशोधनपार्किन्सन रोगाशी निगडित आनुवंशिक उत्परिवर्ती अल्फा सायनुक्लीन प्रथिनावरील अभ्यास केला आहे. जीन उत्परिवर्तनामुळे प्रथिनातील अमिनो आम्ल बदलतात. यामुळे झालेले उत्परिवर्ती प्रथिन पेशीसाठी हानिकारक अथवा उपयुक्त असू शकते.अल्फा सायनुक्लीन जीन उत्परिवर्तन किंवा गुणन पार्किन्सन रोग होण्याशी संबंधित आहे. उत्परिवर्ती अल्फा प्रथिनांवर जैवभौतिक व पेशीसंबंधी संशोधन केले आहे. या संशोधनामध्ये ‘उत्परिवर्ती अल्फा प्रथिन जास्त प्रमाणात आॅलिगॉमर तयार करतात.हे आॅलिगॉमर कदाचित पार्किन्सन रोग होण्यास कारणीभूत असावेत,’ असा निष्कर्ष या निघाला आहे.आयआयटीचा पदवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत घेतली. तत्पूर्वी, त्यांनी पुणे विद्यापीठाच्या आयबीबी संस्थेत १ वर्ष, बंगळुरू येथील एनसीबीएस संस्थेत १ वर्ष, तर टाटाज् इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रीसर्च या संस्थेत ३ वर्षे संशोधनाचे काम केले....तरीही शेतीतील कामसंशोधक असूनही गणेश यांच्यातला कष्टकरी शेतकरी जिवंत आहे. ‘लोकमत’ला संशोधनाविषयी माहिती देत असतानाच ते ‘मला आता गार्इंच्या धारा काढायच्या आहेत. इथं आहे तोपर्यंत भावाला मदत करतो. आई-वडील, वहिनी, पत्नी सकाळपासून शेतात भुईमूग काढत आहेत. आमच्या शेतीला पाण्याची मोठी अडचण आहे. कुटुंबाच्या कष्टामुळे भुईमुगाचे पीक हाती लागले आहे; मात्र डाळिंबात मोठे नुकसान झाले. भाऊ अरुण यांनी मोठ्या कष्टाने डाळिंबाची बाग जगविली आहे. मात्र, बाजारात दर नसल्याने त्याचा हिरमोड झाला,’ असे सांगितले. मुलाच्या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली, या आनंदाने आई-वडिलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.

टॅग्स :Healthआरोग्यPuneपुणे