वीजबचत करणाऱ्या फ्रिजवर संशोधन
By Admin | Updated: August 4, 2014 04:23 IST2014-08-04T04:23:46+5:302014-08-04T04:23:46+5:30
विजेची टंचाई व विजेचे दर यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. घरात फ्रिज हे साधन अत्यावशक आहे. त्यासाठी विज सर्वाधिक लागते.
वीजबचत करणाऱ्या फ्रिजवर संशोधन
पुणे : विजेची टंचाई व विजेचे दर यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. घरात फ्रिज हे साधन अत्यावशक आहे. त्यासाठी विज सर्वाधिक लागते. परंतु येथील जयवंत सांवत महाविद्यालयातील शिक्षकांनी संशोधन करुन विजेच्या बचतीचा मार्र्ग शोधला आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून २३ लाखांचे अनुदान मिळाले आहे.
पावसाच्या अनियमितपणामुळे जलविद्युत प्रखल्पावर होणार परिणाम, कोळसाच्या कमतरतेमुळे औष्णिक प्रकल्पावर होणारा परिणाम, यामुळे भारनियमनाला तोंड द्यावे लागत आहे. कोळशाचे मर्यादीत साठे आणि विजेची दरवाढ आणि तेवढ्याच प्रमाणात निर्माण होणारी कमतरता यांमुळे वीजबचत हा विष़य विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोदनाचा प्रमुख विषय बनत चालला आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन वीज बचत करण्यावर संशोधकांचा कल वाढत आहे. अशाच एक संशोधनाला सध्या यश आले आहे. या संशोधनासाठी हडपसर येथील जेएसपीएम शिक्षम संस्थेच्या जयवंतराव सांवत कॉलेज अॉफ इंजिनिअरि ंग महाविद्यालयातील शिक्षक डॉ. वि. के. भोजवानी, प्राचार्य डॉ.एम.जी.जाधव आणि यंत्र अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख सुनिता फडकुले यांना भारत सरकारच्या डिपार्टमेंट अॉफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी नवी दिल्ली यांच्यातर्फे २३ लाखाचे अनुदान मिळाले आहे. मधुरा सेवेकरी ही याच महाविद्यालयाची विद्यार्थीनी संशोधन सहाय्यक म्हणून या प्रकल्पावर काम करत आहे.
हडपसर येथील या विद्यार्थ्यांच्या संशोधनाचे पुणे शहर व जिल्ह्यात कौतुक होत आहे.
(प्रतिनिधी)