कॅन्सर, स्वाईन फ्लूवर विद्यापीठात संशोधन

By Admin | Updated: May 22, 2014 05:56 IST2014-05-22T05:56:26+5:302014-05-22T05:56:26+5:30

पुणे विद्यापीठासह जगभरातील ११ विद्यापीठे एकत्रित येत विविध रोग, औषधे यांवर संशोधन केले जाणार आहे

Research on Cancer, Swine Fluver University | कॅन्सर, स्वाईन फ्लूवर विद्यापीठात संशोधन

कॅन्सर, स्वाईन फ्लूवर विद्यापीठात संशोधन

पुणे : पुणे विद्यापीठासह जगभरातील ११ विद्यापीठे एकत्रित येत विविध रोग, औषधे यांवर संशोधन केले जाणार आहे. यासाठी अमेरिकेतील पेन स्टेट विद्यापीठाने पुढाकार घेतला असून त्याबाबत लवकरच करार केला जाणार आहे. पुणे विद्यापीठ भारतातील एकमेव विद्यापीठ असून येथे टीबी, कॅन्सर, डेंगी, स्वाईन फ्लू यांसारख्या अन्य रोगांवर संशोधन केले जाणार आहे. मागील काही वर्षांपासून पुणे विद्यापीठाने परदेशी विद्यापीठांशी करार करीत विविध विषयांत संशोधनाला प्राधान्य देण्याचे धोरण अवलंबिले आहे. अमेरिकेतील पेन स्टेट विद्यापीठाशी यापूर्र्वी पुणे विद्यापीठाने काही करार केले आहेत. त्यानंतर आता हा महत्त्वाचा प्रकल्प विद्यापीठाला मिळाला आहे. अमेरिकेतील एका फंडिंग एजन्सीकडे पुणे विद्यापीठासह चीन, ब्राझील, युरोपमधील काही देश तसेच अन्य काही देशांतील ११ विद्यापीठांनी याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. त्याला लवकर अंतिम स्वरूप येईल. भारतात केवळ पुणे विद्यापीठाचा यामध्ये समावेश आहे. अशा प्रकारे ११ विद्यापीठांनी एकत्रित येत संशोधन करण्याचा हा पहिलाच प्रकल्प असल्याची माहिती पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिली. पुणे विद्यापीठात टीबी, कॅन्सर यांसह डेंगी, स्वाईन फ्लू यांसारख्या रोगांवर संशोधन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे भारतीय पारंपरिक औषधपद्धतीवर म्हणजे प्रामुख्याने आयुर्वेदावर या संशोधनावर भर दिला जाणार आहे. या प्रकल्पाबाबत कराराचा पहिला टप्पा पार पडला आहे. पुढील काही महिन्यांत अंतिम करार करून संशोधनाला प्रत्यक्षात सुरुवात होईल, असे डॉ. गाडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)

Web Title: Research on Cancer, Swine Fluver University