मुलाची सुखरूप सुटका, अग्निशामक दलाची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 03:24 AM2018-01-05T03:24:40+5:302018-01-05T03:24:48+5:30

भावना व्यक्त करण्यासाठी भाषेची गरज नसते़ प्रेमाचा, आपुलकीचा एक स्पर्शही खूप काही सांगून जातो, याचा प्रत्यय गुरुवारी अग्निशामक दलाच्या जवानांना आला़ वानवडी येथील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीत अडकलेल्या एका ७ वर्षांच्या मुलाची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली़

 The rescue of the child, the performance of firefighters | मुलाची सुखरूप सुटका, अग्निशामक दलाची कामगिरी

मुलाची सुखरूप सुटका, अग्निशामक दलाची कामगिरी

Next

पुणे - भावना व्यक्त करण्यासाठी भाषेची गरज नसते़ प्रेमाचा, आपुलकीचा एक स्पर्शही खूप काही सांगून जातो, याचा प्रत्यय गुरुवारी अग्निशामक दलाच्या जवानांना आला़ वानवडी येथील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीत अडकलेल्या एका ७ वर्षांच्या मुलाची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली़ या मुलाचे पालक अरबी असून त्यांना अरबी भाषेशिवाय अन्य कोणीच भाषा येत नसल्यामुळे मुलाची सुटका केलेल्या अग्निशामक दलाच्या जवानांशी प्रेमाने हात मिळवून त्यांचे आभार मानले़
ही घटना वानवडी येथील स्टेप इन हॉटेलसमोर एका इमारतीत गुरुवारी सायंकाळी ७ वाजता घडली. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एक मुलगा गॅलरीत अडकल्याची माहिती अग्निशमन दलास मिळाली. दलाकडून कोंढवा (खुर्द) अग्निशमन केंद्रातील गाडी रवाना करण्यात आली. मुलगा गेले तीन तास फ्लॅटच्या मुख्य दरवाजास कुलूप लागल्याने व पालक बाहेर गेल्याने गॅलरीत अडकला होता. या इमारतीत पोहोचताच अग्निशमन दलाचे जवान राहुल बांदल यांनी परिस्थिती पाहून तिसºया मजल्यावरील एका फ्लॅटच्या गॅलरीतून मुलाला आवाज देत मुलगा सुखरूप असल्याची खात्री केली. जवान बांदल यांनी तिसºया मजल्यावरील गॅलरीतून एका सज्जाचा आधार घेत धाडसाने चौथ्या मजल्यावरील गॅलरीत प्रवेश केला व अवघ्या पाच मिनिटांत मुलाची सुखरूप सुटका केली. गॅलरीत प्रवेश करताच मुलाच्या चेहºयावर नकळतच हास्य उमटले. जवान बांदल यांनी मुलाला घेऊन मुख्य दरवाजा उघडला. त्याच वेळी या मुलाचे पालक परतले व मुलाला जवान बांदल यांनी उचलून घेतलेले पाहून पालकांना गहिवरून आले. मुलगा सुखरूप असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
अग्निशमन दलाचे चालक दत्तात्रय वाघ तसेच जवान राहुल बांदल, संदीप जगताप यांना वेगळाच अनुभव आला. मुलाचे पालक अरबी असून त्यांना मराठी, हिंदी किंवा इंग्रजी कोणतीच भाषा समजत नव्हती. जवान बांदल यांनी त्यांना नाव विचारले असता त्यांनी प्रत्युत्तरार्थ फक्त ‘अरबी अरबी’ असे म्हटले. सदर कुटुंब हे अरबी असून त्यांना अरबी भाषेशिवाय कोणतीही भाषा येत नसावी, असा अंदाज घेऊन त्यांच्याकडील कागदपत्रे पाहून मुलाचे नाव महमुद्दीन हकामे (वय ७) असल्याचे समजले होते.

Web Title:  The rescue of the child, the performance of firefighters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे