शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: "वेळ मागितली तरीही राज ठाकरेंची भेट झाली नाही..." राजीनाम्यानंतर वसंत मोरे भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 14:50 IST

सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी आज राजीनामा दिला....

पुणे : वसंत मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर पुण्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे. मोरे हे मनसेकडून सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्या बेधडक स्टाईलमुळे ते समाज माध्यमावर प्रसिद्ध आहेत. तसेच कात्रजसह पुणे शहरात मोरेंचा दांडगा जनसंपर्क आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी आज राजीनामा दिला. 'वसंत मोरे हेच आमचा पक्ष, त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. साध्या कार्यकर्त्यापासून वसंत मोरे यांनी आम्हाला संधी दिली होती, अशी प्रतिक्रिया पर्यावरण सेनेच्या नितीन जगताप यांनी दिली.

राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आजपर्यंतच माझं करियर राज ठाकरेंसोबत होते. मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक होतो. पण पक्षातीलच काही नेत्यांचा मला विरोध होता. ते लोक वरिष्ठांपर्यंत चुकीचा निरोप पाठवत होते. राज ठाकरेंकडे भेटीसाठी वेळ मागितली पण त्यांची वेळ मिळाली नाही. मनसेची पुण्यातील कार्यकारिणी चुकीच्या हातात असल्याचेही मोरे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना वसंत मोरे भावुक झाले होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले,  पुणेकरांनी लढायलं सांगितले तर मी नक्की लढणार. शहरातील नागरिकांसाठी मी लढणार. पुणेकर जे म्हणतील तो मी निर्णय घेणार. शरद पवारांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. माझा निर्णय पुढील दोन दिवसांत जाहीर करेन, असंही मोरे म्हणाले.

पुढे बोलताना वसंत मोरे म्हणाले, मला वारंवार त्रास दिला जात होता. माझ्यासोबत असलेल्या लोकांना डावलले जात होते. मी वारंवार तक्रारी साहेबांपर्यंत पोहचवल्या, परंतु त्यानंतरही काहीच बदल झाला नाही. माझ्यावर अन्याय होत असेल, माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांना डावललं जात असेल तर त्या पक्षात न राहिलेलेच बरे असंही मोरे म्हणाले.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेPuneपुणे