आळंदीत विविध सामाजिक उपक्रमांनी प्रजासत्ताक साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:09 IST2021-02-05T05:09:58+5:302021-02-05T05:09:58+5:30

-- श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील ध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे खजिनदार डॉ. दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर ...

Republic celebrated by various social activities in Alandi | आळंदीत विविध सामाजिक उपक्रमांनी प्रजासत्ताक साजरा

आळंदीत विविध सामाजिक उपक्रमांनी प्रजासत्ताक साजरा

--

श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील ध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे खजिनदार डॉ. दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर येथे संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय समिती सदस्य योगेंद्र कुऱ्हाडे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी अनिल वडगावकर, भगवान लेंडघर, पांडुरंग घुंडरे, देवराम वहिले, जनार्दन घुंडरे, रुक्मिणी कांबळे, पंडित थोरात, तुकाराम मुळीक, प्राचार्य दीपक मुंगसे, उपमुख्याध्यापक सिद्धनाथ चव्हाण, पर्यवेक्षक सूर्यकांत मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षक प्रतिनिधी श्रीरंग पवार आदी उपस्थित होते.

--

आळंदी नगरपरिषद येथे प्रजासत्ताक दिनी मुख्याधिकारी अंकुश जाधव व नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, सर्व समिती सभापती, विद्यमान नगरसेवक, सर्व नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व नगरपरिषद शाळा शिक्षक व कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.

भारतीय घटनेत सांगितलेल्या पर्यावरण संवर्धनाचे महत्व सर्वांना समजावून सांगण्यात आले. तसेच मा. शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाची संकल्पना समजावून सांगून सर्व उपस्थितांना हरित शपथ देण्यात आली. याप्रसंगी स्वच्छ आळंदीची संकल्पना साकारण्यासाठी प्राथमिक स्तरावर काम करणा-या सफाई कर्मचारी वर्गाचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला व सर्व सफाई कर्माचा-यांना पुरस्कृत करण्यात आले.

--

२७आळंदी ध्वजारोहण

फोटो ओळ : आळंदी - देवाची (ता. खेड) येथे ज्ञानेश्वर विद्यालयात ध्वजारोहण करताना नागरिक

Web Title: Republic celebrated by various social activities in Alandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.