शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

दडपण झुगारून जा परीक्षांना सामोरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 7:04 AM

दहावी-बारावीच्या परीक्षांच्या हंगामाला सुरूवात झालेली आहे. पालकांकडून या परीक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांवर सातत्याने बिंबवले गेल्याने याला सामोरे जाताना विद्यार्थी प्रचंड दडपणाखाली जातात.

पुणे/पिंपरी : दहावी-बारावीच्या परीक्षांच्या हंगामाला सुरूवात झालेली आहे. पालकांकडून या परीक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांवर सातत्याने बिंबवले गेल्याने याला सामोरे जाताना विद्यार्थी प्रचंड दडपणाखाली जातात. मात्र, या परीक्षेत गुण कमी पडले म्हणजे सर्वकाही संपलं असं नाही, वर्ष वाया न जाऊ देता हे गुण सुधारण्याची एक चांगली संधी बोर्डाकडून उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो या परीक्षांचे दडपण झुगारून त्यांना आत्मविश्वासाने सामोरे जा, असे आवाहन शिक्षकांकडून करण्यात आले आहे. पिंपरीमध्ये बारावीची प्रात्याक्षिक परीक्षा कठीण गेली म्हणून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. बोर्डाच्या परीक्षेतील यश म्हणजेच सर्वकाही मानून विद्यार्थी हे टोकाचे मार्ग अवलंबतात. मात्र, त्यांच्या या कृत्याचा पालकांना, कुटुंबीयांना आयुष्यभराचा धक्का सहन करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या ताणतणावांचा हसत-खेळत मुकाबला करायला शिकले पाहिजे.नववी परीक्षा संपते नाही तोपर्यंत दहावीचे भूत मानगुटीवर बसलेलेच असते. कठोर शिस्तीमधील दहावीचे वर्ष पार पडल्यानंतर अकरावीची छोटीशी विश्रांती मिळते. त्यानंतर पुन्हा बारावी, नीट, सीईटी, जेईई, जेईई अ‍ॅडव्हान्स आदी परीक्षांच्या आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण कालखंड असतो. आपली तयारी चांगली झाली आहे, तसंच सर्वच विषय आपल्याला झेपणारे आहेत, असा आपला विश्वास द्विगुणित होतो.काळजी नका करू, तुम्ही नापास होणार नाहीदहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये नापास होणाºयांची टक्केवारीखूपच कमी झाली आहे. आपण दहावीच्या परीक्षेमध्ये नापासहोऊ, याची एक अनामिक भीती मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनावाटत असते. या विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी विभागीय मंडळाकडून जिल्हानिहाय समुपदेशकांचे मोबाइल क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.परीक्षेच्या बदलेल्या स्वरूपामुळे नापास होणाºया विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी झाली आहे, त्यामुळे तुम्ही नापास होऊच शकत नाही, असा विद्यार्थ्यांना धीर देण्याचे काम समुपदेशकांकडून केले जाते.पुणे विभागीय मंडळाकडून रमेश पाटील (पुणे) - ९८२२३३४१०१, एस. एल. कानडे (नगर) -९०२८०२७३५३, पी. एस. तोरणे(सोलापूर) - ९९६०००२९५७ या समुपदेशकांचे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. परीक्षेबाबतच्या कुठल्याही समस्येबाबत सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत विद्यार्थी त्यांना फोन करू शकतील असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.राज्य मंडळाकडून समुपदेशक म्हणून आमचे मोबाइल क्रमांक जाहीर केल्यानंतर परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे फोन कॉल येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातले काही फोन वेगवेगळया विषयांमधील अडचणींबाबत होते. काही विद्यार्थ्यांना परीक्षेचे दडपण जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना नेमके कशाचे दडपण येत आहे, याचा खोलात जाऊन शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्या त्या कारणांनुसार त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाते. दडपण दूर करण्याचे प्रयत्न केले जातात. - पी. एस. तोरणे, समुपदेशकविद्यार्थ्यांनी आपल्या मनातील न्यूनगंड बाजूला सारून मानसिक ताण न घेता धैर्याने परीक्षेला सामोरे जाणे आवश्यक आहे. दहावी व बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजन करून अभ्यास करावा व मुद्देसूद प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करावा. सध्या स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे या स्पर्धेत टिकण्यासाठी सकारात्मक दृष्टीने विचार करून परीक्षेला सामोरे जाणे गरजेचे आहे.- एकनाथ उगले, पालक, निगडीपरीक्षेच्या काळातही काळजी घ्यापुरेशी झोप घ्या. कमीत कमी७ ते ८ तास झोप घ्या.अभ्यासाचे वेळापत्रक बनवा. जेवण, झोप व अभ्यासाच्या वेळा ठरवून घ्या.लिहिणे आणि बसणे याचा सराव या काळात ठेवायलाच हवा.परीक्षेच्या काळात शक्यतो मोबाइल फोन बंद ठेवणेच जास्त चांगले.परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात वर्षभरात काढलेल्या नोट्सच्या अभ्यासवर भर द्यावा.संपूर्ण दिवस अखंड अभ्यास करण्यापेक्षा, मधे मधे छोटेब्रेक, विश्रांती घ्यावी.आवडीच्या विषयानेअभ्यासाची सुरुवात करावी.परीक्षेच्या शेवटच्या आठवड्यात मॉडेल टेस्ट पेपर तीन तासांचीवेळ लावून सोडवण्याचा सराव करायला हवा.गरज वाटत असल्यास,मोठ्यांचे मार्गदर्शन जरूर घ्यावे.प्रत्येक दिवशी स्वत:च्या सोयीनुसार व आवडीनुसारसर्वच विषयांना थोडा-थोडावेळ द्यावा.

टॅग्स :examपरीक्षा