G-20 Summit: जी २० देशांच्या प्रतिनिधींना घडवणार किल्ले सिंहगडाची सफर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 11:55 AM2023-05-24T11:55:23+5:302023-05-24T11:56:17+5:30

पुणे ते सिंहगड रस्त्याची डागडुजी, दुरुस्ती व सुशोभीकरण करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी पुणे महापालिका, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत...

representatives of G20 countries will make a trip to Sinhagad fort g 20 summit | G-20 Summit: जी २० देशांच्या प्रतिनिधींना घडवणार किल्ले सिंहगडाची सफर

G-20 Summit: जी २० देशांच्या प्रतिनिधींना घडवणार किल्ले सिंहगडाची सफर

googlenewsNext

पुणे : जी २० देशांच्या प्रतिनिधीची बैठक पुण्यात जून महिन्यात होणार आहे. त्यासाठी निमंत्रित परदेशी पाहुण्यांना किल्ले सिंहगडाची सफर घडवून आणली जाणार आहे. याकरिता पुणे ते सिंहगड रस्त्याची डागडुजी, दुरुस्ती व सुशोभीकरण करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी पुणे महापालिका, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.

जी २० परिषदेचे आयोजन भारत, इटली व इंडोनेशिया या तीन देशात केले जाणार आहे. त्यानुसार महाराष्ट्रात १२ ते १४ जून २०२३ या कालावधीत माहिती व तंत्रज्ञान या विभागाची तिसरी बैठक पुणे येथे होणार आहे. या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या नियोजन व आयोजन करण्याची जबाबदारी केंद्र शासनाबरोबरच राज्य शासनावरही असून, या कालावधीत जगातील जवळपास ४० देशांमधून सुमारे १०० जण सहभागी होणार आहेत.

यासाठी येणाऱ्या निमंत्रितांना स्थानिक पर्यटन व स्थळ दर्शनांतर्गत किल्ले सिंहगड येथे घेऊन जाणे नियोजित आहे. या कालावधीत पुणे येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालख्या मुक्कामी असल्याने निमंत्रित पाहुण्यांना एनडीए खडकवासला मार्गे सिंहगडावर घेऊन जाण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी रस्त्याची डागडुजी, दुरुस्ती व सुशोभीकरण यास तात्काळ सुरुवात करावी, असे आदेश विभागीय आयुक्त यांनी पुणे महापालिका, पुणे जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.

Web Title: representatives of G20 countries will make a trip to Sinhagad fort g 20 summit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.