शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नपत्रिका फुटल्याचा पुणे मंडळाने मागविला अहवाल; विभागीय सचिवांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 15:18 IST

बारावीचा इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरु असतानाच तो बार्शीच्या वसंत महाविद्यालय तांबेवाडी येथून व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांना त्या ठिकाणी चौकशीसाठी तातडीने पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देबारावीची प्रश्नपत्रिका व्हायरल करून कॉपी करण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपचा केला जातो उपयोगपेपरफुटी रोखण्यासाठी मंडळाने कडक उपाययोजना करूनही पेपर व्हायरल होण्याच्या प्रकारांत वाढ

पुणे : बारावीचा इंग्रजीचा पेपर परीक्षा सुरु असतानाच तो बार्शीच्या वसंत महाविद्यालय तांबेवाडी येथून व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी, गटशिक्षण अधिकारी यांना त्या ठिकाणी चौकशीसाठी तातडीने पाठविण्यात आले आहे. त्याबाबतचा अहवाल लगेच देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे विभागीय मंडळाचे सचिव बबन दहिफळे यांनी दिली.बारावीची प्रश्नपत्रिका व्हायरल करून कॉपी करण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपचा उपयोग केला जातो. वसंत महाविद्यालयातून प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्यानंतरही इंग्रजीच्या पेपरमधील उत्तरे लिहून ती पेपर देत असलेल्या विद्यार्थ्यांना पुरविली जात असल्याचे आढळून दिसून आले आहे.गेल्या दोन-तीन वर्षांपासून दहावी-बारावीचा पेपर सुरू असतानाच व्हॉट्स अ‍ॅपवरून प्रश्नपत्रिका व्हायरल होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. या प्रकारांना रोख लावण्यासाठी राज्य मंडळाकडून यंदा बारावीच्या परीक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. परीक्षेदरम्यान प्रत्येक वर्गातील प्रश्नपत्रिकांचे सिलबंद पाकिट विद्यार्थ्यांच्या सहीने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर उशीरा येणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला होता.व्हॉट्स अ‍ॅपवरून प्रश्नपत्रिका व्हायरल होण्याचे प्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाकडून एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने काही शिफारशी केल्या होत्या. प्रत्येक वर्गातील पर्यवेक्षकांकडे २५ प्रश्नपत्रिकांचे सिलबंद पाकिट देण्यात येणार. पर्यवेक्षकांनी हे सिलबंद पाकिट परीक्षा कक्षातील दोन परीक्षार्थ्यांची सही घेऊन उघडायचे असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली तरीही प्रश्नपत्रिका पेपर सुरू होताच व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झाली आहे. त्याचबरोबर यात सहभागी असलेले विद्यार्थी परीक्षा केंद्रात उशीराने आल्याचे निर्दशनास आले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षीपासून उशीरा येणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश न देण्याचाही निर्णय मंडळाकडून घेण्यात आला आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी मंडळाने कडक उपाययोजना करूनही पेपर व्हायरल झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Maharashtra Education Boardमहाराष्ट्र शिक्षण मंडळPuneपुणेWhatsAppव्हॉट्सअॅप