राज्यभरातील  ग्रामसेवक १ जानेवारीपासून सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप सोडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 02:12 PM2017-12-27T14:12:59+5:302017-12-27T14:16:08+5:30

अकोला : शासकीय कामकाजाच्या नावाखाली व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत आहे. शासकीय कामाचे आदेश, विविध उपक्रम, बैठकांचा निरोप ऐनवेळी दिल्याने ग्रामसेवकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यातून अनेकांना विविध आजार बळावत आहेत, त्यामुळे राज्यातील सर्व ग्रामसेवक सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप येत्या १ जानेवारीपासून सोडणार असल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना मंगळवारी पाठविले.

Gramsevak from across the state will leave the government's WhatsApp app groups from January 1! | राज्यभरातील  ग्रामसेवक १ जानेवारीपासून सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप सोडणार!

राज्यभरातील  ग्रामसेवक १ जानेवारीपासून सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप सोडणार!

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयांकडून व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपची निर्मिती करण्यात आली. वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी रात्री-अपरात्री केव्हाही धमकीवजा आदेश देतात. ऐनवेळी कामाच्या आदेशामुळे ग्रामसेवकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत.

अकोला : शासकीय कामकाजाच्या नावाखाली व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत आहे. शासकीय कामाचे आदेश, विविध उपक्रम, बैठकांचा निरोप ऐनवेळी दिल्याने ग्रामसेवकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यातून अनेकांना विविध आजार बळावत आहेत, त्यामुळे राज्यातील सर्व ग्रामसेवक सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप येत्या १ जानेवारीपासून सोडणार असल्याचे पत्र महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना मंगळवारी पाठविले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयांकडून व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपची निर्मिती करण्यात आली. त्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी रात्री-अपरात्री केव्हाही धमकीवजा आदेश देतात. तत्काळ कामांसाठी आदेश सोडतात, त्यामुळे कायदे, नियम मोडीत काढले जात आहेत. ऐनवेळी कामाच्या आदेशामुळे ग्रामसेवकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. हृदयरोग, रक्तदाबाच्या तक्रारी आहेत. ग्रामसेवकांना आधीच अतिरिक्त कामांचा ताण आहे, त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाणही वाढले आहे. हे प्रकार टाळण्यासाठी सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमधून बाहेर पडण्याचा निर्णय युनियनने घेतला आहे. त्याचवेळी इतर अधिकृत संगणकीय प्रणालीचा वापर करण्याचेही ठरले. त्याबाबतचे निवेदन ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी प्रधान सचिवांसह सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना पाठविले आहे.
- सरकारी कामांसाठी स्मार्ट फोनचा वापर नाही!
सरकारी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप सोडण्यासोबतच शासनाचे विविध उपक्रम राबवण्यासाठी स्वत:च्या स्मार्ट फोनवर कोणतेही अ‍ॅप डाउनलोड न करण्याचेही ठरविण्यात आले. त्यामध्ये एसबीएम फोटो अपलोड करणे, पीक कापणी प्रयोग अ‍ॅप, जियो टॅगिंग कामाचा समावेश आहे. ग्रुप सोडण्यामुळे शासकीय कामकाजावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे.


 आपले सरकार सेवा केंद्राला १२ हजाराची खिरापत
सध्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये असलेल्या आपले सरकार सेवा केंद्र चालवणाºया कंपनीला दरमहा १२ हजार रुपये दिले जात आहेत. सरकारी कामे या ठिकाणी ग्रामसेवक डाटा एन्ट्री आॅपरेटरकडून करून घेतील. त्या ठिकाणी अडचणी असल्यास गटविकास अधिकारी यांच्यामार्फत कंपनीला माहिती दिली जाईल. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी संगणकीय माहिती देणे, ई-मेल करण्यासाठी इंटरनेट सुविधा नसणे, टेलिफोन सेवा नसणे, तांत्रिक अडचणी, डाटा एन्ट्री आॅपरेटर नसण्याच्या अडचणीही आहेत.

 

Web Title: Gramsevak from across the state will leave the government's WhatsApp app groups from January 1!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.