शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कदमवाकवस्ती परिसरातील मृत महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कातील २७ जण तपासणीसाठी पुण्याला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 14:41 IST

संबधित महिलेवर उपचार चालु असताना गुरुवारी मध्यरात्री संबधित महिलेचा मृत्यू

ठळक मुद्देमृत्युनंतर खासगी रुग्णालय प्रशासनाने संबधित महिलेची केली कोरोना टेस्ट

पुणे : कदमवाकवस्ती ह्द्दीतील माळवाडी येथील एका महिलेला मागील कांही दिवसांपासुन मूत्राशयाचा त्रास सुरु असल्याने बुधवारी (दि. २९)तिला दुपारी हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. संबधित महिलेवर उपचार चालु असताना गुरुवारी मध्यरात्री संबधित महिलेचा मृत्यू झाला. मृत्युनंतर खासगी रुग्णालय प्रशासनाने संबधित महिलेची कोरोना टेस्ट केली असता वरील धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.      दरम्यान, माळवाडी येथील मृत्युमखी पडलेली महिला कोरोना बाधित असल्याचे समोर येताच कदमवाकवस्ती ग्रामपंचायत प्रशासन व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या माळवाडी येथील तब्बल सत्तावीस जणांना तातडीने माळवाडी परिसरातील नागरिकांपासुन वेगळे केले आहे. त्यांची कोरोनाची तपासणी करण्यासाठी मृत कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील सर्वांना पुणे येथील नवले रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. के. जाधव यांनी दिली.       याबाबत अधिक माहिती देताना लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, डॉ. डी. जे. जाधव म्हणाले, आशा वर्करनी तीनच दिवसांपूर्वी माळवाडी परिसरातील घरोघरी जाऊन माहिती घेतली होती. त्यावेळी महिलेच्या नातेवाईकांनी महिला आजारी असल्याबाबत कसलीही माहिती दिली नव्हती. मात्र, बुधवारी मुत्राशयाचा त्रास सुरु झाल्याने, संबधित महिलेला हडपसर येथील रुग्नालयात दाखल केले होते. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास महिलेचा मृत्यू झाल्यानंतर, महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच, ग्रामपंचायतीने माळवाडी व परिसर निर्जंतुकीकरण करुन घेतले आहे. तसेच हा भाग पूर्णपणे सील केला असुन, महिलेच्या संपर्कात आलेल्या सत्तावीस जणांची कोरोना टेस्ट करण्यासाठी त्यांना पुण्याला पाठविले आहे. तसेच संबधित महिलेच्या संपर्कात आणखी कोणी आले का याची माहिती घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

पुर्व हवेलीत भीती वाढली..दरम्यान गेल्या पंधरा दिवसाच्या कालावधीत उरुळी कांचन येथील एका महिलेसह चार जण कोरोना बाधित असल्याचे आढळुन आले आहे. या चार जणांत सत्तेचाळीस वर्षीय महिला, संबधित महिलेवर उपचार करणारे कदमवाकवस्ती येथील खाजगी रुग्णालयातील एक डॉक्टर, दोन नर्सचा समावेश आहे. वरील डॉक्टर व महिलेच्या संपर्कात आलेल्या सव्वाशेहुन अघिक जण क्वारंटाईन असतानाच, माळवाडी येथील येथील महिलेचा मृत्यू झाल्याची बाब पुढे आल्याने पूर्व हवेलीत भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू