शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेतील अकार्यक्षम अधिकारी-कर्मचाऱ्यांना बदलीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 8:56 PM

एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेतील सात अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली

ठळक मुद्देकाही अधिकाऱ्यांबद्दल भ्रष्टाचार व कामातील अनियमितेच्या तक्रारी अधिकारी-कर्मचारी तर २० वर्षाहून अधिक काळ एकाच ठिकाणी

पुणे : वर्षानुवर्षे एकाच पदावर कार्यरत असूनही कार्यक्षमता न दाखविणारे अधिकारी व कर्मचारी एसटी महामंडळाच्या रडारवर आले आहेत. दापोडी येथील एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेतील काही अकार्यक्षम अधिकाऱ्यांना बदलीची शिक्षा देण्यात आली आहे. तसेच त्यांची प्रशासकीय चौकशीही सुरू करण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, यातील काही अधिकाऱ्यांबद्दल भ्रष्टाचार व कामातील अनियमितेच्या तक्रारी आहेत. एसटी महामंडळाच्या मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयासह राज्यभरातील मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय कार्यालये, आगार याठिकाणी अनेक अधिकारी - कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. काही अधिकारी-कर्मचारी तर २० वर्षाहून अधिक काळ एकाच ठिकाणी आहेत. मध्यवर्ती कार्यालयाच्या एका बदली आदेशानुसार वषार्नुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अशा दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेतील सात अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तसेच त्यांना तातडीने नव्या ठिकाणी रुजू होण्यास सांगून त्यांची प्रशासकीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे एसटी प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मध्यवर्ती कार्यालयाने आज काढलेल्या बदली आदेशामुळे अनेक प्रस्थापितांना धक्का देण्यात आला आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. स्वत:च्या स्वार्थासाठी स्थानिक पुढाऱ्यांचे हितसंबंध जोपासत आपली तुंबडी भरणाऱ्या, अनेक वर्ष एकाच पदावर कार्यरत राहून वेळोवेळी कृष्णकृत्य करणाऱ्या या अधिकाऱ्यांची प्रशासकीय चौकशी देखील लावण्यात आल्याने यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. प्रशासनाची कार्यक्षमता वाढवणे आणि उत्पन्न वाढीसाठी कसून प्रयत्न करणे, यासाठी राज्यभरातील अशा अनेक एसटीच्या कार्यालयांमध्ये वेगळ्या कारणांनी वषार्नुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांवरही ही कारवाई केली जाणार आहे. त्याची सुरूवात दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेपासून करण्यात आल्याचे एसटी महामंडळाच्या प्रसिध्दीपत्रकात नमुद करण्यात आले आहे.---------------मध्यवर्ती कार्यशाळेतील बदली करण्यात आलेली अधिकारी (कंसात सध्याचे पद)प्रियदर्शनी वाघ (भांडार अधिकारी), अजितसिंह राजपुत (सहायक अधिक्षक), अंकुश रेणके (सहायक अधिक्षक), विजय सोनवणे (सहायक भांडारपाल), अमिर गुलाब सय्यद (सहायक भांडारपाल), संजय यादव (प्रमुख कारागीर), मिलिंद तिकोणे (सहायक कारागीर).------------अनेक वर्ष एकाच पदावर राहूनही कार्यक्षमता न दाखविणाऱ्या अधिकाऱ्यांवर एसटीची नजर राहणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सहा वर्ष एकाच पदावर असलेले अधिकारी-कर्मचारी आहेत. सध्या कारवाई करण्यात आलेल्या काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कमी प्रतीच्या मालाची जाणीवपुर्वक खरेदी करणे, निविदाप्रक्रियेत अनियमितता, तसेच स्वत:च्या फायद्यासाठी काम करत असल्याचे गंभीर आरोप काही जणांवर आहेत. या आरोपांमध्ये सकृतदर्शनी तथ्य असल्याचे आढळून आल्याने त्यांची बदली करून चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती एसटीतील अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेTransferबदली