शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

कांद्याची जागा कोबी काढतोय भरून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 13:17 IST

भाववाढीमुळे कांदा न ठेवणेच पसंत केले..

ठळक मुद्दे कांद्याचे हे वाढलेले दर डिसेंबरअखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता गरजेपुरताच हॉटेल व्यायसायिकांकडून कांद्याचा वापर

पुणे : सर्वसामान्यांच्या घरातून उच्चांकी भाववाढीमुळे हद्दपार झालेला कांदा आता हॉटेल व्यावसायिकांनाही नकोसा झाला आहे़. भाजीवाटणापुरताच कांदा मर्यादित राहिला आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकांनी जेवणाबरोबर कांद्याऐवजी आता कोबी देण्यावरच भर दिला आहे़. दुसरीकडे शहरातील भाजीपाला व्यावसायिकांनीही या भाववाढीमुळे कांदा न ठेवणेच पसंत केले असल्याचे दिसून येत आहे़. दिवसागणिक कांद्याचा भाव किलो मागे दहा पंधरा रुपयांनी वाढत चालला आहे़. जो कांदा बाजारात उपलब्ध होत आहे. तो बारीक, नवा तसेच बहुतांशी भिजलेला व खराबच आहे़. यामुळे असा कांदा तोही शंभरीच्या पुढे असल्याने विक्रीसाठी ठेवताना किरकोळ भाजीपाला व्यापारीही कच खात आहेत़. परिणामी, उपलब्ध कांद्याची किरकोळ बाजारात १३० ते १५० रुपयांपर्यंत विक्री होत आहे़. आजमितीला शहरात अनेक ठिकाणी जुना कांदा शोधूनही सापडत नाही, अशी परिस्थिती आहे़. त्यातच कुठे विक्रीस असला तरी त्याचा भाव हा किरकोळ विक्रीत दीडशे रुपयांच्या पुढेच आहे़. यामुळे किलोने खरेदी होणारा कांदा आज रोजी गरजेपुरताच, तोही तीस चाळीस रुपये पावशेर दराने खरेदी करण्यावर अनेकांनी समाधान मानले आहे़. दरम्यान, अशा परिस्थितीत शहरात चौका-चौकात दिसणाºया अंडाबुर्जीच्या गाड्यांची संख्याही रोडावली असून, ज्या आहेत. तेथे बुर्जीतील कांद्याचे प्रमाण कमी झाले आहे़. बहुतांशी हॉटेलमध्ये कांदा मागितल्यावर जादाचे दर ग्राहकांना द्यावे लागतील, असेही सांगितले जात आहे़ तर अनेक ठिकाणी कांदा नव्हे तर काकडी व कोबी पत्ता बारीक करून दिला जात आहे़. शहरात निवडणुकीपूर्वी कांदा पन्नाशीवर पोहोचला असताना, अनेक ठिकाणी वीस रुपये किलो दराने अनेक इच्छुकांच्या कार्यकर्त्यांनी कांदा विक्री केंद्रे सुरू केली होती़. परंतु, आता कांद्याचा हाच दर तिप्पट झाला असता ही कांदा विक्री केंद्रे गेली कुठे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे़. ..शहराची गरज दररोज शंभर ट्रक कांद्याची : आवक मात्र वीस-पंचवीस गाड्या 1 मार्केट यार्डमध्ये दररोज येणारा शंभर ट्रक कांदा आजमितीला वीस ते पंचवीस गाड्यांवर आला आहे़ मागणीनुसार होणारी ही आवक पाहता ती अतिशय तुटपुंजी असून, हीच परिस्थिती जानेवारीपर्यंत कायम राहील, अशी शक्यता आहे़ 2 सद्य:स्थितीला मार्केट यार्डात येणारा कांदा हा नवा व बारीक असून, त्याचा घाऊक बाजारातील दर ८० ते १०० रुपये इतका आहे़. जुना कांदा हा क्वचितच येत असून, ही आवक अत्यंत नगण्य आहे़. त्याचा दर घाऊक बाजारातच १४० ते १५० रुपये आहे़. 

कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी, कांद्याचे हे वाढलेले दर डिसेंबरअखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता असल्याचे सांगितले. जानेवारीपासून नव्या कांद्याची आवक वाढण्याची शक्यता आहे़. सद्य:स्थितीला दक्षिण भारतातूनही कांद्याला मोठी मागणी आहे़. यामुळे परदेशतील कांदा जरी आला तरी, कांदादरात घट होण्याची सध्यातरी शक्यता नसल्याचे ते म्हणाले़ .

टॅग्स :PuneपुणेonionकांदाFarmerशेतकरीhotelहॉटेल