शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
4
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
5
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
6
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
7
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
8
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
9
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
10
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
11
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
12
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
13
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
14
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
15
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
16
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
17
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
18
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
19
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
20
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर प्रतिकूल परिणाम करणारे कृषी कायदे रद्द कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST

पुणे : शेतकऱ्यांवर प्रतिकूल परिणाम करणारे कृषी कायदे रद्द करा. या मागणीसाठी देशव्यापी शेतकरी आंदोलन गेले ६० दिवस चालू ...

पुणे : शेतकऱ्यांवर प्रतिकूल परिणाम करणारे कृषी कायदे रद्द करा. या मागणीसाठी देशव्यापी शेतकरी आंदोलन गेले ६० दिवस चालू आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता दिल्लीच्या सीमेवर विविध राज्यातील शेतकरी लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करत आहेत. यात आजवर १५२ आंदोलक शहीद झाले आहेत. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कामगार-सामाजिक संघटना, राजकीय पक्ष विविध प्रकारची आंदोलने करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांची संघर्ष कहाणी या तरुणांनी सांगितली.

खाजगीकरण टाळा शेतकरी वाचवाचे फलक, संघटनेचे झेंडे, अनेक ठिकाणी लंगर, आंदोलनात पाण्याचा मारा-बॅरिगेट्स-पोलीस यांना सामोरे जाणे अशा गोष्टी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात पाहायला मिळाल्या, असे अनुभव शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या पुण्यातील तरुण शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. लोकायतच्या वतीने शेतकरी आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभागी तरुणांचे अनुभव कथन याविषयी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

दिल्लीतील सिंघू, टिकरी व गाझी सीमेवर सुरू असणाऱ्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी व सहभागी होण्यासाठी पुण्यातील २६ तरुण गेले होते. त्यामध्ये नोकरदार, इंजिनिअर, शिक्षक, विद्यार्थी अशा सर्वांचा समावेश होता.

विमल कुंडलिक म्हणाले, शेतकरी आंदोलनात शेतकरी महिलाही सहभागी झाल्या आहेत. शेकडो किलोमीटरवरून येऊन त्या बॉर्डरवर बसल्या आहेत. त्यांच्या घरी नवरा शेती सांभाळत आहे. या महिला मुलींना घेऊन सहभागी झाल्या आहेत. पंजाबमधील जे शेतकरी आंदोलनात आले आहेत. त्यांच्या महिला गावाकडे आत्मविश्वासाने काम करत आहेत.

---

दिल्लीत सर्व सुखसोयी उपलब्ध करून आंदोलन चालू ठेवले आहे. शेतकरी संघटनांकडून झेंडे, कॉर्पोरेट भागाओ किसान बचाओ असे मजकूर लिहिलेले फलक, शेतकऱ्यांकडे दिसून आले. शेतकरी एकमेकांना सहकार्य करून शांततेत आंदोलन करत आहेत. कार्टून्स, डिझाइन, च्या माध्यमातून अनेक अडचणींना तोंड देत शेतकरी विजयी झाला, असे दाखवण्यात आले आहे.

- गीतांजली प्रकाश, सहभागी आंदोलक

---

आंदोलनात येथील गुरुद्वाराकडून लंगर चालू केले आहे. शेतकऱ्यांबरोबर अनेक गरजू नागरिकही त्याचा लाभ घेत आहेत. एक महिन्याच्या आंदोलनात गरीब आणि कष्टकरी लोकांच्या पोटाचा प्रश्न सुटला आहे. यावरून शेतकरी अन्नदाता असल्याचा संदेश समाजात पोहोचत आहे. शेतकरी आंदोलनात येणाऱ्या सरकारी अडथळ्यांनाही सामोरे जात आहे. तरुण पिढीसोबत ज्येष्ठही यामध्ये सहभागी झाले आहेत.

- कल्याणी दुर्गा रवींद्र, सहभागी आंदोलक