शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

किल्ल्यांच्या दुरूस्तीसाठी गडप्रेमींनी पुढे यावे : श्रमिक गोजमगुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:02 IST

किल्ल्यांच्या डागडुजी, दुरुस्ती आणि सुरक्षेसाठी स्वयंसेवी संस्था व गडप्रेमींना पुढाकार घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देपुरातत्व खात्याकडून ३५० पैकी केवळ ७८ किल्ले संरक्षित 

पुणे :  महाराष्ट्रात ३५० किल्ले असले तरी पुरातत्व खात्यातर्फे फक्त ७८ किल्ले संरक्षित केले जात असून,उर्वरीत किल्ल्यांच्या डागडुजी व दुरुस्ती आणि सुरक्षेसाठी स्वयंसेवी संस्था व गडप्रेमींना पुढाकार घेण्याची गरज असल्याचे गडकिल्ल्यांचे अभ्यासक श्रमिक गोजमगुंडे यांनी सांगितले. लालमहालात झालेल्या शिवधनुष्य पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. शिवधनुष्य प्रतिष्ठान व छत्रपती शिवाजी महाराज पायी पालखी सोहळा समितीतर्फे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवनेरी ते रायगड असा सुमारे २६५ किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो. पायी पालखीचे बुधवारी शिवनेरीहून पुण्यात लालमहालात आगमन झाले. यानिमित्त शिवधनुष्य पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी पार पडला. रायगडाची गेली २८ वर्षे सेवा करणारे सुधीर थोरात, जुन्नर तालुक्यातील वृद्धांची सेवा करणारी संस्था राजाराम पाटील वृद्धाश्रम आधार केंद्र व संपूर्ण गावात वृक्षारोपण करून वेगळा संदेश देणारे उरळी कांचन जवळील अष्टापूर गाव , बियॉंंड कॉपोर्रेशन सर्व्हिसेस कंपनीचे संचालक पराग मते आणि शिवशाहीर हेमंत मावळे, कलावंत सचिन गवळी यांचा सन्मान करण्यात आला. कन्याकुमारी ते काश्मीर असा सायकलवरून प्रवास करून वृक्षाचे व पाण्याचे महत्व सांगत प्रसार करणारी सायली महाराव या तरुणीचाही यावेळी खास सन्मान करण्यात आला . याप्रसंगी शिवधनुष्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक कालेकर, भोई समाजाच्या महिला अध्यक्षा भोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.सत्काराला उत्तर देताना सुधीर राऊत म्हणाले, रायगडाचा विकास आराखडा राज्य शासनाने तयार केला आहे . या विकास आराखड्याची अंमलबजावणी योग्य होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत.------------------------------------------------------------ 

टॅग्स :PuneपुणेFortगड