पुणे: शहरात सरकारी कार्यालयांची संख्या मोठी असल्यामुळे विविध कार्यालयांमधील शासकीय कर्मचारी व अधिका-यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्युडी) सदनिका बांधून ठेवलेल्या आहेत.परंतु,सदनिका शिल्लक नसल्याचे कारण सांगून कर्मचा-यांना काही महिने किंवा वर्ष सदनिका मिळविण्यासाठी वाट पहावी लागते.मात्र,पीडब्ल्यूडीच्या अनेक सदनिकांमध्ये भाडेकरूंचा सुळसुळाट असल्याची माहिती समोर आली आहे.तसेच अपु-या मनुष्यबळामुळे या खोल्या खाली करण्यास पीडब्ल्यूडीला अडचणी येत असल्याचे या विभागीत अधिका-यांकडून सांगितले जात आहे. पुण्यात शालेय शिक्षण, उच्च शिक्षण संचालक, कृषी, सहकार या राज्य स्थरावरील कार्यालयासह विभागीय आयुक्त कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलिसांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पीडब्ल्यूडी विभागाने विविध कार्यालयांमध्ये काम करणा-या कर्मचारी व अधिका-यांसाठी सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील पोलीस वसाहतींचे डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. परंतु, अजूनही अनेक सदनिकांची स्थिती वाईट आहे.सदनिकांची संख्या कमी असून कर्मचारी व अधिका-यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सदनिका मिळविण्यासाठी पीडब्ल्यूडी कार्यालयाच्या खेटा माराव्या लागतात,असे एकीकडे चित्र आहेत. तर अनेक सदनिकांमध्ये कर्मचा-यांऐवजी इतर व्यक्ती राहत असल्याचे पीडब्ल्यूडीला आढळून आले आहे.पीडब्ल्यूडीच्या सदनिकांचा बेकायदेशीरपणे वापर केला जात असल्याची माहिती स्वत: पीडब्ल्यूडी विभागाने माहिती अधिकारात केलेल्या अर्जावर दिली आहे.मात्र,संबंधित इमारतीमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणा-या व्यक्तींवर कोणतीही कारवाई केली जात नाही.सामाजिक कार्यकर्ते आजय लोंढे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास याबाबत निवेदन दिले आहे.परंतु,त्यानंतरही जिल्हा प्रशासन किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्याही हालचाली केल्या नाहीत.क्विन्स गार्डन येथील ‘18 राणीचा बाग’ येथील पीडब्ल्यूडी विभागाच्या इमारतीमध्ये 12 व्यक्ती अनधिकृतपणे राहत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सदनिकांची स्थिती तितकीशी चांगली नाही. त्यामुळे काही कर्मचारी मिळालेल्या सदनिकांमध्ये न राहता त्यात भाडेकरू ठेवतात.तर काही सदनिकांचे कुलूप तोडून त्यात काही कुटुंब अनधिकृतपणे राहत आहेत.परंतु,पीडब्ल्यूडीच्या कर्मचारी व अधिका-यांकडून या सदनिकांची पहाणीच केली जात आही.त्यामुळे या सदनिकांमध्ये काही कुटुंब वर्षानुवर्षे बेकायदेशीरपणे राहत आहेत,असे सामाजिक कार्यकर्ते अजय लोंढे यांनी सांगितले.-----------------------सार्वजनिक बांधकाम विभागाने काही महिन्यांपूर्वीच सदनिका तपासणी मोहिम राबवून कोणत्या सदनिकेमध्ये कोणता व्यक्ती अनधिकृतपणे राहत आहे,याबाबतची माहिती संकलीत करण्यात आली आहे. परंतु, संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पीडब्ल्यूडीकडे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे विभागातील काही अधिका-यांकडून सांगितले जात आहे.की
पीडब्ल्यूडीच्या सदनिकांमध्ये भाडेकरूंचाच सुळसुळाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 22:00 IST
अनेक सदनिकांमध्ये कर्मचा-यांऐवजी इतर व्यक्ती राहत असल्याचे पीडब्ल्यूडीला आढळून आले आहे.
पीडब्ल्यूडीच्या सदनिकांमध्ये भाडेकरूंचाच सुळसुळाट
ठळक मुद्देक्विन्स गार्डन येथील पीडब्ल्यूडी विभागाच्या इमारतीमध्ये 12 व्यक्ती अनधिकृतपणे सदनिकांची संख्या कमी असून कर्मचारी व अधिका-यांची संख्या अधिक