शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातून भाड्याने आणलेली आॅडी पुण्यात विकण्याचा डाव  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 21:01 IST

गोवा येथून आॅडी कार भाड्याने आणत ती पुण्यात विकण्याचा प्लॅन करणाऱ्याला ४२ लाख रुपये किंमतीची गाडी जप्त केली.

ठळक मुद्देबंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत न्यू पुना क्लब रस्त्यावर कारवाई

पुणे : गोवा येथून आॅडी कार भाड्याने आणत ती पुण्यात विकण्याचा प्लॅन करणाऱ्या एकाला खंडणी विरोधी पथकाने उधळून लावला. आॅडी विकण्याचा प्रयत्न करणा-याला उत्तरप्रदेश येथील व्यक्तीला पथकाने २४ तासात जेरबंद केले आहे.    अशिष विजय डे (वय ३५) असे अटक केलेल्याचे नाव आहे. डे याला अटक करून गोवा पोलिसांच्या ताब्यत देण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनसाखळी चोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत न्यू पुना क्लब रस्त्यावर संशयितपणे आॅडी गाडी फिरताना त्यांना दिसली. त्यावेळी ही गाडी अडविण्यात आली. चालक डे याच्याकडे गाडीच्या कागदपत्रे मागण्यात आली. त्यावेळी गोवा येथील बागा, कलंगुट येथून ही गाडी भाडे तत्त्वावर आणली आहे, असे सांगितले. मात्र त्याकडे अधिक तपास केला गाडी पुणे अथवा मुंबई येथे विकणार असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी गोवा येथील कलंगुट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला गोवा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.     डे कडील ४२ लाख रुपये किंमतीची गाडी जप्त केली. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे, पोलीस कर्मचारी भाऊसाहेब कोंढरे, प्रमोद मगर, रमेश गरूड आणि नारायण बनकर यांनी ही कारवाई केली. 

टॅग्स :PuneपुणेAudiआॅडीCrimeगुन्हाPoliceपोलिस