शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

शैक्षणिक परिषदेमधून विभागप्रमुखांना हटविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 13:45 IST

जानेवारी २०१७ शैक्षणिक परिषदेमध्ये विद्यार्थ्यांनी शुल्क, अभ्यासक्रम, शिस्त असे अनेक मुद्दे मांडल्याने नियामक मंडळाने शैक्षणिक परिषदेमधून विद्यार्थी प्रतिनिधींना हटविले.

ठळक मुद्दे‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन : आज मुंबईत शैक्षणिक परिषद 

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)च्या शैक्षणिक परिषदेमधून विद्यार्थ्यांसह विभागप्रमुखांना हटविल्याच्या  निषेधार्थ विद्यार्थ्यांनी सोमवारी आंदोलन केले. ‘गिव्ह बॅक अवर अकॅडमिक कौन्सिल’, ‘स्टॉप फी हाईक’ अशा स्वरूपाचे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. उद्या (दि. २४) मुंबईमध्ये शैक्षणिक परिषदेची बैठक होत आहे, त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलनाचे शस्त्र उगारले. दरम्यान, संस्थेमधील विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला.केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या जीडी खोसला कमिटीनुसार शैक्षणिक परिषदेमध्ये एफटीआयआयच्या स्टुडंट असोसिएशनचाही समावेश असायला हवा. अभ्यासक्रम, शुल्क, शिक्षण पद्धती व धोरण, प्रवेश परीक्षा, गुणवत्ता पद्धती, शिष्यवृत्ती, पायाभूत सुविधा व शाखा या संदर्भातील सर्व निर्णय शैक्षणिक परिषदेमार्फत घेतले जातात. जानेवारी २०१७ शैक्षणिक परिषदेमध्ये विद्यार्थ्यांनी शुल्क, अभ्यासक्रम, शिस्त असे अनेक मुद्दे मांडल्याने नियामक मंडळाने शैक्षणिक परिषदेमधून विद्यार्थी प्रतिनिधींना हटविले. केवळ विभागप्रमुख असे होते की ज्यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न अवगत होते. एक शेवटची त्यांचीच आशा होती. मात्र नियामक मंडळाने नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये बेकायदेशीरपणे शैक्षणिक परिषदेमधून विभागप्रमुखांनाही काढून टाकले. त्याबदल्यात विद्यार्थीविरोधी सदस्यांना शैक्षणिक परिषदेमध्ये स्थान दिले जात आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांना शुल्कवाढीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे समाजातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी एफटीआयआयमध्ये शिक्षण घेणे स्वप्नवत ठरण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे स्टुडंट असोसिएशनचे म्हणणे आहे. दरम्यान, एफटीआयआयची शैक्षणिक परिषद उद्या (दि. २४) मुंबईमध्ये एफटीआयआयचे अध्यक्ष बी. पी. सिंग यांच्या अध्यतेखाली होणार आहे. या बैठकीमध्ये संस्थेतील अकरा विभागप्रमुखांना सहभागी होता येणार नाही. यापुढे शैक्षणिक परिषदेमध्ये विभागाचे अधिष्ठाता सहभागी होतील. विभागप्रमुखांनी त्यांच्याशी चर्चा करून अडचणी सांगाव्यात, असा निर्णय एफटीआयआयच्या नियामक मंडळाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजच्या बैठकीत होणार आहे. दरम्यान, या बैठकीच्या स्थळी विद्यार्थी आंदोलन करणार आहेत.............‘एफटीआयआयमधील अनेक मुद्दे थेट विद्यार्थ्यांशी संबंधित आहेत. शैक्षणिक परिषदेत विद्यार्थी व विभागप्रमुखांना सहभागी होण्याचा अधिकार परत मिळायला हवा, तरच अनेक विषयांवर चर्चा घडू शकते आणि विद्यार्थ्यांना नक्की काय हवंय हे पोहोचविता येऊ शकते.- अधीत, अध्यक्ष, स्टुडंट असोसिएशन.......चित्रपट विभागाचे सात प्रमुख आणि दूरचित्रवाणी विभागाचे चार प्रमुख या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत. दोन्ही विभागांचे अधिष्ठाता तसेच दोन विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित असतील. विद्या परिषदेच्या आधी अधिष्ठातांनी विभागप्रमुखांशी व विद्यार्थ्यांशी चर्चा करून बैठकीत मुद्दे मांडायचे आहेत. नियामक मंडळाच्या जूनमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.-भूपेंद्र कँथोला, संचालक-एफटीआयआय

टॅग्स :PuneपुणेFTIIएफटीआयआयStudentविद्यार्थीbhupendra kaintholaभूपेंद्र कँथोला