शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? देशवासीयांना केलं मोठं आवाहन
2
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
3
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
4
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
5
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
6
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
7
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
8
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
9
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
10
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
11
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
12
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
13
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
14
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
15
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
16
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
17
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
18
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
19
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
20
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांपेक्षा रुग्णाच्या नातेवाईकांकडूनच रेमडेसिविरचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:11 IST

पुणे : रेमडेसिविर हा कोरोनावरचा रामबाण उपाय नाही. तरीही गरज नसताना अनेक जण इंजेक्शनसाठी धावपळ करत आहेत.‌ अनेकदा ...

पुणे : रेमडेसिविर हा कोरोनावरचा रामबाण उपाय नाही. तरीही गरज नसताना अनेक जण इंजेक्शनसाठी धावपळ करत आहेत.‌ अनेकदा तर डॉक्टरांपेक्षा रुग्णाच्या नातेवाईकांकडूनच रेमडेसिविरचा आग्रह धरला जात आहे. वास्तविक हे आजाराच्या शोधात असलेलं इंजेक्शन असून कोरोनावर ते काही अंशीच उपयुक्त ठरत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. राज्यात सध्या सगळीकडेच रेमडेसिविरचा तुटवडा असलेला पाहायला मिळत आहे. लोकांनी अक्षरशः दुकानाबाहेर रांगा लावलेल्या आहेत. अनेकांना उपलब्ध नसल्याने परत जावे लागत आहे. मात्र, कोरोना झाला की काही जण लगेच रेमडेसिविरसाठी धावपळ करतात. त्याची गरज नसल्याचे डॉक्टरांचे मत आहे. कारण रेमडेसिविर हे औषध हा कोरोनावरचा रामबाण उपाय नाही. अनेक रुग्णांना ते कारण नसतानाही दिले जात आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील डॉ. समीर जोग म्हणाले, "रेमडेसिविर हे खरं तर रोगाच्या शोधात असलेल्या औषध आहे. वेगवेगळ्या साथी जेव्हा आल्या तेव्हा तेव्हा ते वापरून पाहिले गेले. कोरोनावर ते काही अंशी परिणाम करत असल्याच सुरूवातीला वाटले. पण आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गायझेशनने अभ्यास करून निष्कर्ष काढला की ते लाईफ सेविंग ड्रग नाही. या इंजेक्शनमुळे लक्षणांची तीव्रता कमी होते. अभ्यासाने हे सिद्ध झालंय की मृत्युदरावर रेमडेसिविरचा काहीच परिणाम नाही. हल्ली डॉक्टरपेक्षा रुग्णाच्या नातेवाईकांकडूनच रेमडेसिविरचा आग्रह धरला जात आहे." सिम्बायोसिस रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय नटराजन म्हणाले, "रेमडेसिविरचा वापर सरसकट होतो आहे. यामुळे गरजूंना त्याची आवश्यकता भासत आहे. लोक गरज पडेल म्हणून खरेदी करून ठेवत आहे. त्यामुळे हा तुटवडा निर्माण झाला आहे. स्वाइन फ्लूच्या वेळी जसा औषधांवर निर्बंध घातले होते तसे निर्बंध लावण्याची आवश्यकता आहे. टास्क फोर्सने हे औषध कधी द्यायचे याच्या गाईडलाईन दिलेल्या आहेत. त्या डॉक्टरांनी पाळणे आणि रुग्णांनी डॉक्टरांना निर्णय घेऊ देणे गरजेचे आहे."

राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, "रेमडेसिविरचा वापर मध्यम स्वरूपच्या इन्फेक्शनमध्ये होतो.

सौम्य रुग्णांमध्ये ते वापरलं जात नाही. मध्यम स्वरूपच्या न्यूमोनियामध्ये त्याचा वापर होतो. ते योग्य वेळी वापरणे आवश्यक आहे. रुग्ण गंभीर झाल्यावर मात्र त्याचा वापर करून फायदा नसतो. मात्र सध्या रुग्णांना जास्त त्रास होऊ नये म्हणून काही प्रमाणात डॉक्टर रेमडेसिविर वापरताना दिसतायेत. गरज पडली तर असावे म्हणून नातेवाईक ही रेमडेसिविरचा साठा करत आहेत. यामागे अर्थातच भीती आहे."