जिल्हा बँकेच्या शाखा कार्यालयाचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:08 IST2021-05-24T04:08:59+5:302021-05-24T04:08:59+5:30

आणे येथील श्री रंगदास स्वामी महाराज विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नुकत्याच नवीन बांधलेल्या भव्य इमारतीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी ...

Relocation of District Bank Branch Office | जिल्हा बँकेच्या शाखा कार्यालयाचे स्थलांतर

जिल्हा बँकेच्या शाखा कार्यालयाचे स्थलांतर

आणे येथील श्री रंगदास स्वामी महाराज विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या नुकत्याच नवीन बांधलेल्या भव्य इमारतीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आणे शाखा कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले. जिल्हा बँकेचे संचालक व माजी उपाध्यक्ष संजय काळे यांच्या उपस्थितीत जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा झाला.

या वेळी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष अर्चना घारे, तुळशीराम भोईर, प्रकाश ताजने, धोंडिभाऊ पिंगट, निवृत्ती काळे, अशोक घोडके, श्री रंगदास स्वामी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमन मंदाकिनी दाते व संस्थेचे सर्व संचालक तसेच विठ्ठल गुंजाळ, बाबाजी शिंदे, प्रशांत दाते, अॅड. संतोष आहेर आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी आमदार अतुल बेनके जिल्हा बँकेचे संचालक संजय काळे व इतर मान्यवर.

Web Title: Relocation of District Bank Branch Office