शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

...अन् प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास; एसटी कर्मचार्‍यांचा संप मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 12:36 IST

पाचव्या दिवशी न्यायालयाच्या आदेशानुसार तात्पुरत्या स्वरूपात संप मागे घेण्यात आल्याने पाच दिवस बंदचा फायदा घेऊन खासगी वाहनांची झालेली चंगळ थांबली आहे.

ठळक मुद्देपाचव्या दिवशी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून कर्मचार्‍यांनी तात्पुरत्या स्वरूपात संप मागे घेतला आहे.या पाच दिवसांत खासगी वाहन चालक प्रवाशांची अक्षरश: लूट करीत असल्याची प्रवाशांमध्ये चर्चा चालू होती.

नेरे/महर्षीनगर : एस. टी. महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी १६ आॅक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ऐन दिवाळीच्या काळात बेमुदत संप पुकारला होता, यामुळे लाखो प्रवाशांचे अतोनात हाल झाले. मात्र पाचव्या दिवशी न्यायालयाच्या आदेशानुसार तात्पुरत्या स्वरूपात संप मागे घेण्यात आल्याने पाच दिवस बंदचा फायदा घेऊन खासगी वाहनांची झालेली चंगळ थांबली आहे.दिवाळीच्या सणाला जाणारे-येणारे प्रवासी, तालुक्याच्या ठिकाणी दिवाळीचा बाजार खरेदीसाठी येणारे ग्रामीण भागातील नागरिक यांना खासगी वाहनांचा आधार घेऊन प्रवास करावा लागत होता. प्रवाशांची तारांबळ उडाली होती. या पाच दिवसांत खासगी वाहन चालक प्रवाशांची अक्षरश: लूट करीत असल्याची प्रवाशांमध्ये चर्चा चालू होती. खासगी वाहनातून प्रवास करताना प्रवाशांचे अतोनात हाल होत होते. प्रवासी मिळेल त्या वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करीत असल्याचे चित्र होते. एस. टी. कर्मचार्‍यांचा हा पुकारलेला संप रास्त असल्याचीही अनेकांची भावना होती. मात्र या संपामुळे बाजारपेठा, बसस्थानके ओस पडली होती.

सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन असलेल्या एस. टी. वाहतुकीचा संप लवकरच मिटेल आणि प्रवाशांचे होणारे हाल थांबतील, अशी अशा नागरिकांना, प्रवाशांना लागून राहिली होती. त्या प्रमाणेच पाचव्या दिवशी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून कर्मचार्‍यांनी तात्पुरत्या स्वरूपात संप मागे घेतला आहे. शनिवार दि. २१ पहाटे पासून महामंडळाच्या एस. टी. बसेसची वाहतूक सुरळीत चालू झाली असल्याने खासगी वाहन चालकांच्या उत्त्पन्नात घट होऊन त्यांनी पाच दिवसात केलेली चंगळ थांबली आहे. 

स्वारगेट बसस्थानक गजबजले प्रवाशांनी

रात्री ११ वाजल्यापासून एसटी बससेवा सुरू करण्यात आली. पहाटेच्या सर्व एसटी बससेवांची फेरी पूर्ण झाली. राज्य परिवहन मंडळाचे सर्व कर्मचारी कामावर रूजू होऊन, एसटी बस ठरवून दिलेल्या मार्गावर घेऊन जात होती. त्यामुळे चार दिवस प्रवाशांनी ओस पडलेले स्वारगेट बसस्थानक पुन्हा प्रवाशांनी गजबजून गेले होते. तत्काळ बुकिंगसाठी प्रवाशांनी तिकीट खिडकीवर रांग लावून गर्दी केली होती. भाऊबीज व शनिवार- रविवारच्या सुट्टीमुळे महिलाप्रवासीवर्गाची विशेष गर्दी दिसून येत होती. त्याचप्रमाणे आरक्षण रद्द करण्यासाठीही रांग दिसून येत होती. आज रद्द केलेल्या आरक्षणासाठी २५ टक्के रक्कम कमी करून मोबदला मिळत होता. 

टॅग्स :StrikeसंपPuneपुणेticketतिकिट