आयुक्त आले अन् कर्मचारी पळाले, हजेरी लावून गप्पा मारणा-यांची उडाली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 06:41 AM2017-10-06T06:41:48+5:302017-10-06T06:41:55+5:30

आयुक्तांची मोटार महापालिकेच्या वाहनतळावर आली. प्रवेशद्वारातून नेहमीप्रमाणे मुख्य प्रशासकीय इमारतीत जाण्याऐवजी सहज पाहणी करण्याच्या उद्देशाने त्यांनी

The commissioner came in and the employees fled, the meeting started and the conversation started | आयुक्त आले अन् कर्मचारी पळाले, हजेरी लावून गप्पा मारणा-यांची उडाली तारांबळ

आयुक्त आले अन् कर्मचारी पळाले, हजेरी लावून गप्पा मारणा-यांची उडाली तारांबळ

Next

पिंपरी : आयुक्तांची मोटार महापालिकेच्या वाहनतळावर आली. प्रवेशद्वारातून नेहमीप्रमाणे मुख्य प्रशासकीय इमारतीत जाण्याऐवजी सहज पाहणी करण्याच्या उद्देशाने त्यांनी इमारतीच्या पाठीमागील बाजूस फेरफटका मारला.
सकाळी ड्युटीवर आल्यानंतर थम केला, हजेरी लागली, आता निवांत झालो असे समजून गप्पा मारणाºयांचे टोळके जमले होते. आयुक्तांना पाहताच कर्मचाºयांची अक्षरश: तारांबळ उडाली.
महापालिकेत सकाळी नऊच्या सुमारास आयुक्त श्रावण हर्डीकर दाखल झाले. अनपेक्षितपणे त्यांनी इमारतीच्या मागील बाजूस पायी जाऊन पाहणी केली. कॅन्टीनजवळ कट्ट्यावर कर्मचारी सकाळीच निवांतपणे गप्पा मारत बसल्याचे चित्र त्यांना प्रत्यक्ष पहावयास मिळाले. काही अंतर गेले तो तीच परिस्थिती. आयुक्त आले हे लक्षात येताच, कामचुकार कर्मचाºयांची अक्षरश: तारांबळ उडाली. आपापल्या जागेवर जाऊन बसण्यासाठी कर्मचारी पटकन निघून गेले. महापालिकेत कामचुकार अधिकारी, कर्मचारी यांची संख्या मोठी आहे. सकाळी कार्यालयात यायचे, हजेरी लावायची, पुन्हा
निघून जायचे. काही कर्मचारी तर सकाळी महापालिकेत थम्ब केल्यानंतर चक्क दुपारनंतर स्वत:चे दुकान अथवा टपरी चालविताना दिसून येतात. क्रीडा विभागात तर प्रचंड अनागोंदी कारभार आहे.
रंगीबेरंगी कपडे, टी शर्ट परिधान करून अधिकारी पुन्हा वावरू लागले. अधिकारी कोण, नागरिक कोण, हे समजणे कठीण झाले. परदेशी यांच्यानंतर राजीव जाधव यांच्या काळातही अधिकारी अधूनमधून गणवेश वापरताना दिसून येत होते. आता त्यात बदल झाला आहे. बेशिस्त कारभार सुरू आहे. ही परिस्थिती अचानक पाहणी केलेल्या आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पहावयास मिळाली.

Web Title: The commissioner came in and the employees fled, the meeting started and the conversation started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.