शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पाेलिसांना दिलासा ; प्रदूषणापासून हाेणार संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 16:58 IST

वाहतूक पाेलिसांना मास्क देण्यात येणार असून यामाध्यमातून प्रदूषणापासून त्यांचे रक्षण हाेऊ शकणार आहे.

पुणे : तासणतास प्रदूषणात उभे राहून वाहतूक नियमन पाेलिसांना करावे लागते. वाहनांमधून सातत्याने बाहेर पडणारा धून, प्रदूषण यांमुळे वाहतूक पाेलिसांना श्वसनाचे विकार हाेण्याची शक्यता असते. त्यातच वाहतूक विभागाने एका चाैकात सहा महिने फिक्स ड्युटीचा निर्णय घेतला असल्याने वाहतूक पाेलिसांना याचा अधिकच त्रास हाेणार आहे. त्यावर आता पुण्यातील वाहतूक पाेलिसांना मास्क देण्यात येणार असून यामाध्यमातून प्रदूषणापासून त्यांचे रक्षण हाेऊ शकणार आहे. 

सध्या राज्यातील सर्वच शहरांमधील प्रदूषण कमालीचे वाढले आहे. हवेच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आयुर्मान देखील कमी हाेत चालले आहे. या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका हा वाहतूक पाेलिसांना बसत असताे. वाहतूक पाेलीस तासंतास चाैकामध्ये उभे राहून वाहतूक नियमन करत असतात. खासकरुन सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी वाहतूकीच्या संख्या अधिक असल्याने या वेळेत अधिक प्रदूषण हाेत असते. या प्रदूषणामुळे श्वसनाचे विविध विकार पाेलिसांना जडत असतात. 

पुण्यातील स्वारगेट, नळस्टाॅप, येरवडा, शिवाजीनगर, विद्यापीठ चाैक या ठिकाणावरुन माेठी वाहतूक हाेत असते. एका चाैकात सलग सहा महिने ड्युटीचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला असल्याने या चाैकांमध्ये कामास असणाऱ्या पाेलिसांना प्रदूषणाचा अधिक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आता सर्वच वाहतूक पाेलिसांसाठी मास्क खरेदी करण्यात आले आहेत. येत्या दाेन दिवसांमध्ये याचे वाटप पाेलिसांना करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली. 

मास्क खरेदी करण्यापूर्वी ससून रुग्णालयाच्या डाॅक्टरांचा सल्ला घेण्यात आला हाेता. त्यांच्या सल्ल्यानुसार चांगल्याप्रतिचे मास्क खरेदी करण्यात आले आहेत. यापूर्वी देखील गांधी टाेपी बराेबरच पाेलिसांना गाेल टाेपी पाेलिसांना देण्यात आली हाेती. या टाेपीमुळे वाढत्या उन्हापासून संरक्षणासाठी या टाेपीचा चांगला फायदा झाला हाेता. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसpollutionप्रदूषणHealthआरोग्य