शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील हजारो शिक्षकांना बदलीमध्ये दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2022 19:24 IST

राज्यातील दुर्गम भागात नोकरी केलेल्या शिक्षकांसाठी पुढील बदल्यांमध्ये अवघड क्षेत्राचा लाभ कायम ठेवण्यात येणार

बारामती : राज्यातील दुर्गम भागात नोकरी केलेल्या शिक्षकांसाठी पुढील बदल्यांमध्ये अवघड क्षेत्राचा लाभ कायम ठेवण्यात येणार आहे. याबाबत  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत झालेल्या बैठकीत आश्वासन मिळाल्याने हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी ही माहिती दिली.

राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांविषयी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक शिक्षक संघाची संभाजीराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत मंत्रालय मुंबई येथे गुरुवारी(दि २७) बैठक पार पडली. यावेळी राज्यातील विस्थापित शिक्षकांचा प्रश्न गंभीर झालेला असून मागील दोन वर्षांमध्ये बदल्या झाल्या नसल्याने विस्थापित शिक्षकांच्या असंतोषाची माहिती  देण्यात आली, यावर्षी बदली प्रक्रिया गतिमान करण्याचा मागणी शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली. ग्रामविकास विभागाने या वेळी बदली सॉफ्टवेअर व सध्याच्या सुरू असलेल्या बदली प्रक्रियेची माहिती दिली. 

सुधारित धोरणातील फेरसर्वेक्षणामुळे जुन्या अवघड क्षेत्रातील शाळा नवीन यादीत सुगम ठरविल्यास राज्यभरात बदल्यांमध्ये फार मोठा गोंधळ उडणार आहे. याबाबत गंभीर चर्चा यावेळी करण्यात आली, या चर्चेनंतर ग्रामविकास विभागाने अखेर जुन्या अवघड क्षेत्रात यापूर्वी काम केलेल्या शिक्षकांचा लाभ कायम ठेवण्यासाठी बदली सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्तीसाठी अभ्यासगटास निर्देश देण्याचे मान्य केले.

बदलीसाठी ३० जून व ३ वर्षे सेवा करणे, महिला प्रतिकूल क्षेत्र कायम ठेवणे, पती-पत्नी, एकल  व विस्थापित शिक्षकांना न्याय देणे या व अन्य महत्त्वाच्या मागण्यांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली .या सर्व मागण्यांवर तातडीने अभ्यास गटासोबतच्या संयुक्त बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्री  मुश्रीफ  यांनी दिले, यावेळी उपसचिव का.गो.वळवी , रवींद्र पाटील यांच्यासह राज्याध्यक्ष अंबादास वाजे, पुणे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे, राज्य संपर्क प्रमुख एस व्ही पाटील व राज्यसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब मारणे म्हणाले, राज्यातील अवघड क्षेत्रात काम करत असलेल्या व यापूर्वी काम केलेल्या हजारो शिक्षकांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीTeacherशिक्षकEducationशिक्षणStudentविद्यार्थी