शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांना दिलासा..! जीबीएस रुग्णांसाठी मोफत इंजेक्शन आणि आर्थिक मदत उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 09:48 IST

GBS Outbreak: ‘जीबीएस’ची पुण्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार खर्चिक

पुणे : ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (Guillain-Barre Syndrome) च्या रुग्णावर महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार होणार आहेत. तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना शहरी गरीब योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतची मदत केली जाईल. या आजाराच्या रुग्णांसाठी ‘इम्युनोग्लोब्यूलिन’ हे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.

‘जीबीएस’ची पुण्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार खर्चिक असल्याने महापालिकेने पुणेकरांना उपचारासाठी आर्थिक मदत करावी, अशी सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली. त्यावर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी हे निर्णय घेतले आहेत. ‘जीबीएस’वर कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत.

खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना शहरी गरीब योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंतच्या उपचारांसाठी मदत केली जाईल. याचबराेबर खासगी अथवा कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जीबीएस रुग्णांना ‘इम्युनोग्लोब्यूलिन’ हे इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. पुण्यात ‘जीबीएस’चे रुग्ण आढळत आहेत. त्यासंदर्भात पालिका खबरदारी घेत आहे. परंतु यावरील उपचार महाग आहेत. त्यामुळे महापालिकेने पुणेकरांना उपचारांसाठी आर्थिक मदत करावी, अशी सूचना आयुक्तांना केली होती.बाधित सोसायट्यांना टँकरद्वारे पाणीनांदेड, किरकटवाडी या भागातील बांधित सोसायट्यांना पुणे महापालिका पिण्याच्या पाण्याचा टॅंकर देणार आहे. त्यात डीएसके विश्व, उत्सव, मोरया स्पर्श, पांडुरंग रेसिडेन्सी, होम फेज २, अर्बन पार्क, कमल ग्रीन लीफ, आनंदबन, इंगवले पाटील कॉम्प्लेक्स, उज्ज्वल निसर्ग सोसायटी, साई गॅलेक्सी या सोसायट्यांचा समावेश आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHealthआरोग्यMuncipal Corporationनगर पालिकाdoctorडॉक्टर