शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

गृहिणींना दिलासा; निर्णय घेताना आमचाही विचार करावा, गॅस वितरक कंपनीचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 14:39 IST

घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात झाली असून तो आता ८०५ रुपयांना मिळणार

पुणे : घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात झाल्यामुळे महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. यामुळे ९०५ रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आता ८०५ रुपयांना मिळणार आहे. मात्र या निर्णयामुळे गॅस वितरक कंपन्यांना भुर्दंड बसला आहे.

आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्ट करून हा निर्णय जाहीर केला. त्यात त्यांनी ‘महिला दिनानिमित्त आमच्या सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देशातील लाखो गृहिणींना दिलासा मिळेल. त्यांच्यावरचा आर्थिक भार हलका होईल.’अचानक केलेल्या या घोषणेमुळे गॅस वितरक कंपन्यांनी आधीच्या दराने विकत घेतलेले सिलिंडर त्यांना १०० रुपये सवलतीच्या दराने वितरित करावे लागणार असल्याने याचा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

फूल ना फुलाची पाकळी असेना, १०० रुपये कमी झाले तरी थोडाफार आर्थिक भार कमी झाला आहे. त्यामुळे या निर्णयाचे मी स्वागत करत असून, या निर्णयामुळे बजेटमध्ये थोडीशी बचत होईल. - रमा चरणकर

सिलिंडरची किंमत १०० रुपयांनी कमी झाली असली तरी वाढत्या महागाईचा डोंगर मात्र तसाच आहे. आज दैनंदिन लागणाऱ्या गोष्टी जसं डाळीसाळींचा खर्च आणि विविध वस्तूंवर टॅक्स भरावा लागतो. कधी कधी महिना अखेर आर्थिक बजेट सांभाळता सांभाळताना कसरत होते.- संगीत उके, गृहिणी

असे निर्णय घेताना नागरिकांसोबतच आमचाही विचार करावा, अशी अपेक्षा आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आम्हा गॅस वितरक कंपनीला १०० रुपये प्रतिगॅस असे नुकसान सहन करावे लागत आहे. हा निर्णय घेताना सर्वसामान्य महिलांचा विचार केला गेला मात्र गॅस वितरक महिलांचा विचार कोण करणार? - उषा पुनावाला, अध्यक्ष, ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :PuneपुणेCylinderगॅस सिलेंडरInflationमहागाईSocialसामाजिकMONEYपैसा