मारहाण करणाऱ्यांची बंधपत्रावर मुक्तता

By Admin | Updated: February 15, 2017 02:26 IST2017-02-15T02:26:18+5:302017-02-15T02:26:18+5:30

तरुणाला मारहाण करणाऱ्या दोघा जणांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एन. शेख यांनी चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर सुटका केली.

Release on the brochure of the victims | मारहाण करणाऱ्यांची बंधपत्रावर मुक्तता

मारहाण करणाऱ्यांची बंधपत्रावर मुक्तता

पुणे : तरुणाला मारहाण करणाऱ्या दोघा जणांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एन. शेख यांनी चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर सुटका केली. ही घटना ११ डिसेंबर २०१३ रोजी सायंकाळी सहा वाजता सिंहगड कॉलेजच्या गेटसमोर घडली होती. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
संग्रामसिंग महेश वाघ (वय २४, कोहिनूर कॉलनी, सहकारनगर) आणि प्रशांत पुनाजी कवटे (वय २३, रा. संभाजीनगर, धनकवडी) असे सुटका करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रशांत प्रकाश वासनिक (वय २६, रा. वडगाव) यांनी फिर्याद दिली होती.
वासनिक त्यांचे मित्र नीतेश सिंग यांच्याबरोबर वर्गामधून बाहेर पडल्यानंतर आरोपींनी त्यांना बोलायचे असल्याचे सांगत बाजूला नेले. पूर्ववैमनस्यातून त्यांना बेदम मारहाण केली. भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या नीतेश यांनाही मारहाण करण्यात आली.
सरकारी वकील एस. ए. क्षीरसागर यांनी या खटल्यात काम पाहिले. त्यांनी एकूण आठ साक्षीदार तपासले. त्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची साक्ष महत्त्वाची ठरली.

Web Title: Release on the brochure of the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.