शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पुणे शहरातील कोरोना निर्बंधात शिथिलता द्या : पुण्याच्या महापौरांचा आरोग्यमंत्र्यांकडे प्रस्ताव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 13:26 IST

अजित पवारांनी निर्णय घ्यावा, अन्यथा सोमवारपासून दुकाने सुरू करणार 

पुणे : राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी आहे त्या ठिकाणी निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे अशा काही भागात अद्यापही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. यात पुणे जिल्हयाचा समावेश आहे. याचवेळी कोरोना निर्बंधात शिथिलता देण्यात यावी अशी मागणी करत आक्रमक भूमिका पुण्यातील व्यापारी महासंघ आणि लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील पुणे शहरात कोरोना निर्बधांमध्ये शिथिलता द्या, अशी मागणी मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. 

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे त्यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. यात पुणे शहरात कोरोना निर्बधांमध्ये शिथिलता द्या अशी मागणी करण्यात आली आहे. आता आरोग्यमंत्र्यांकडून या प्रस्तावावर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पुण्यात दर शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकी आयोजित करण्यात येते. त्यावेळी मात्र, या आठवड्यात मात्र अजित पवार यांच्या उपस्थितीत होणारी कोरोना बैठक रविवारी होण्याची शक्यता आहे. 

अजित पवारांनी निर्णय घ्यावा, अन्यथा सोमवारपासून दुकाने सुरू करणार पुणे शहरातील सर्व व्यापारी शनिवार-रविवारचा लॉकडाऊन पूर्णपाळणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हा प्रशासनाने शहरातील सर्व दुकानांच्या वेळा  वाढवण्याचा निर्णय रविवारी होणाऱ्या कोरोना आढावा बैठकीत जाहीर करावा. अन्यथा सोमवारपासून पुन्हा शहरातील दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत  आम्ही सुरू ठेवणार आहे, असे स्पष्टपणे पुणे  व्यापारी महासंघाने जाहीर केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. या विरोधात लक्ष्मी रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी निर्बंध झुगारुन सलग तिसऱ्या दिवशीही दुकाने उघडी ठेवली आहेत. नियम डावलून सुरू असलेल्या दुकानांचे पोलिसांनी शुक्रवारीही फोटो काढले. मात्र, व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

सर्व मॉल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्या पुणे शहरातील शॉपिंग मॉल्समध्ये बाह्य एजन्सीद्वारे कर्मचाऱ्यांसह अंदाजे ७६ हजार लोक काम करतात. कोविड निर्बंधांमुळे उद्योगांचे जवळपास १५ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. किरकोळ स्टोअर्स आणि रेस्टॉरंट्समध्ये काम करणारे जवळपास ८० टक्के कर्मचारी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि त्यांच्या उपजीविकेवर सर्वात जास्त परिणाम झाला आहे. त्यामुळे शहरातील सर्व मॉल पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एससीएआई) वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्याMayorमहापौर