शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

२८ तोळे सोने पिशवीत घेऊन फिरणाऱ्या आजीच्या नातेवाईकांचा सोशल मीडियाने घेतला शोध  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 13:35 IST

अडचणीत असलेल्यांना पोलिसांची तत्परतेने मदत मिळाल्याचा अनुभव शुक्रवारी नुकताच आला.

ठळक मुद्देसिंहगड रस्ता पोलिसांची कार्यतत्परता ; आजीने मानले पोलिसांचे आभार 

नहे : अडचणीत असलेल्यांना पोलिसांची तत्परतेने मदत मिळाल्याचा अनुभव शुक्रवारी नुकताच आला. वयोमानामुळे विसरभोळा झालेला स्वभाव तसेच अंधारामुळे रस्ता चुकून नऱ्हे येथे आलेल्या आजीला सिंहगड रस्ता पोलिसांनी आस्थेने चौकशी करून अवघ्या दोन तासात नातेवाईकांचा शोध घेऊन पिशवीत असलेल्या अठ्ठावीस तोळे सोन्यासह आजीला नातेवाईकांच्या ताब्यात दिले. सीताबाई बाबुराव बिनीवाले या ७५ वर्षाच्या आजीला घर सापडत नसल्याने एका अनोळखी इसमाने रात्री आठच्या सुमारास आजीला नऱ्हे पोलीस चौकीत आणून सोडले. मी शेजारच्या मुलीच्या लग्नाला गेले होते. मात्र, आता मला नऱ्हे मधील घर सापडत नाही, मला घरी सोडा अशी विनवणी आजी पोलिसांना करू लागली. सहायक पोलीस निरीक्षक सुरज पाटील यांनी गांभीर्य लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना आजीच्या नातेवाईकांना शोधण्याच्या सूचना दिल्या. पोलीस कॉन्स्टेबल गोरख चिनके यांनी आजीकडे चौकशी केली असता त्यांच्याजवळ असणाऱ्या पिशवीमध्ये अठ्ठावीस तोळे सोने असल्याचे लक्षात आले. यापूर्वी कसबा पेठेतील भोई आळीमध्ये राहावयास असल्याचे आजीने माहिती दिली.मात्र, मध्येच आजी आपण काय बोलतो हे विसरत असल्याने पोलिसांना चौकशी करताना अडचण येत होती. सध्या नऱ्हे मध्ये राहत असून मला घरचा पत्ता माहित नसल्याचे आजीने सांगितले, आजीने मला तीन मुली असून मुलगा नसल्याचे सांगितले. पोलिसांनी नातवांची नावे विचारली असता आजीने केतन भानारकर असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सदर नातवाचे नाव फेसबुकवर शोधून नातवाचा फोटो आजीला दाखविला असता तोच माझा नातू असल्याचे आजीने सांगितल्यावर पोलीस कॉन्स्टेबल चिनके यांनी कसबा पेठ येथील आपल्या मित्रांना संपर्क साधून सदर आजीबद्दल माहिती देऊन तिच्या नातेवाईक मिळतात का याबाबत विचारपूस केली. त्यानंतर आजीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून तिचा नातू केतन राजू भानारकर (वय २८, गोपीनाथ नगर , कोथरूड)  यांच्या ताब्यात आजीला देण्यात आले. नातेवाईकांनी व आजीने पोलिसांचे आभार मानले.   

टॅग्स :PuneपुणेGoldसोनंPoliceपोलिस