शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणी, बिल्डरांचे लागेबांधे नागरिकांच्या जिवावर : महेश झगडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 14:32 IST

मुसळधार पावसामुळे आंबिल ओढा तसेच शहराच्या इतर भागांतील नाल्यांना पूर येऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ..

ठळक मुद्दे‘पूरस्थिती खूप भयावह आहे. याला कारणीभूत असलेले हितसंबंध जगजाहीर जुलै २०१० मध्ये अशाच प्रकारे मुसळधार पावसाने नाल्यांना पूर

पुणे : शहरातील अनेक नाल्यांचे नैसर्गिक स्रोत बदलण्यात आले आहेत. त्यावर अतिक्रमणे झाली आहेत. बांधकाम परवानग्याही चुकीच्या पद्धतीने दिल्या आहेत. अशा सर्वच गोष्टींचा शोध घेण्यासाठी तसेच पूर परिस्थितीवर उपाययोजना सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडला होता. पण त्यावर काहीच निर्णय झाला नाही. राजकारणी, विकसक, अधिकारी यांचे लागबांधे असल्याने ही समिती प्रत्यक्षात आली नाही, असा थेट आरोप माजी आयुक्त महेश झगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.मुसळधार पावसामुळे आंबिल ओढा तसेच शहराच्या इतर भागांतील नाल्यांना पूर येऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काहींना आपले जीव गमवावे लागले, तर अनेकांचा संसार पुराच्या पाण्यात वाहून गेला. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या जलतांडवानंतर पुण्याचे माजी आयुक्त राहिलेले झगडे यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला. ‘पूरस्थिती खूप भयावह आहे. याला कारणीभूत असलेले हितसंबंध जगजाहीर आहेत. हे तोडण्याचा मी प्रयत्न केला,’ असे सांगत त्यांनी त्यावेळी स्थायी समितीला केलेल्या एका समितीच्या शिफारशीची माहिती दिली आहे. पण समितीने त्याला विरोध केला. आता खूप उशीर झाला असला तरी जागे व्हायला हवे, असे आवाहनही झगडे यांनी केले आहे.याविषयी ‘लोकमत’शी झगडे म्हणाले, २००९ मध्ये आयुक्त म्हणून रुजू झालो. त्यानंतर हळूहळू कामाबाबतची परिस्थिती लक्षात येत होती. जुलै २०१० मध्ये अशाच प्रकारे मुसळधार पावसाने नाल्यांना पूर आला होता. त्या वेळीही भयानक स्थिती होती. मलाही त्याचा फटका बसला. याबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांशी बोललो. पण त्यांनी, नेहमीच असा पाऊस येतो, त्यात नवीन काही नाही, असे सांगितले. पण मी अधिकाऱ्यांसह बावधनकडून येणाºया नाल्याची सुरुवात ते नदीपर्यंत पाहणी केली. अनेक ठिकाणी हा नाला वळविण्यात आला होता. त्यावर अनधिकृत बांधकामे झाली होती. मधेच नाला बंद करण्यात आला होता. काही ठिकाणी त्यावर रस्ते करण्यात आले होते. सोयीनुसार त्याचा प्रवाहच बदलण्यात आला होता. त्यामुळेच पूरस्थिती निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. विकास आराखड्यामध्ये नैसर्गिक नाल्याचा प्रवाहच दाखवायला नाही. आराखडा व प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये फरक होता. प्रशासन, अधिकारीच बांधकामांना परवानगी देते. त्यांच्यावर कुणाचा दबाव असतो हे सर्वांना माहीत आहे. चुकीच्या पद्धतीने परवानग्या देण्याचे प्रकार विकसक, राजकारण्यांच्या दबावाखालीच होतात.......पूरस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी २०१० मध्ये स्थायी समितीकडे उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. निवृत्त न्यायाधीश व सचिव दर्जाचे आयएएस अधिकारी त्यात असतील. ........शहरातील पावसाळी गटारे, नाले, ओढ्यांची स्थिती व भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून करावयाच्या उपायोजना तसेच दोषींना शिक्षा व्हावी हा समितीचा हेतू होता. समितीच्या शिफारशी पालिकेला बंधनकारक ठरल्या असत्या; पण अधिकाºयांच्या दबावाखाली स्थायी समितीने प्रस्ताव फेटाळला. ..........विजय कुंभार, विवेक वेलणकर, निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत यांनी नंतर पुढाकार घेतला. पण त्यांची समिती वांझोटी ठरली असती. त्यातील शिफारशींच्या अंमलबजावणीचे बंधन नव्हते, असे झगडे यांनी सांगितले......पूरस्थिती निर्माण होण्यामागची कारणे माहिती आहे. नेमका रोग माहीत असल्याने त्यावर उपचार करणे शक्य आहे. पण उपाययोजना करण्यापूर्वी त्याभोवती केवळ चर्चा सुरू असते. त्यानंतर काही दिवसांत हा विषय दुर्लक्षित होतो. अजूनही उशीर झालेला नाही. उपाययोजना करता येऊ शकतात. आतापासून प्रयत्न सुरू केले तर अशा घटनांची तीव्रता कमी करता येईल. मी आयुक्त असताना तसे प्रयत्न केले. लोकांच्या जिवाशी खेळण्याचा अधिकार कुणालाही नाही. नागरिकांनी याबाबत पुढे यायला हवे. - महेश झगडे, माजी आयुक्त, पुणे महापालिका

टॅग्स :PuneपुणेfloodपूरPoliticsराजकारणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका