भुकूमच्या सरपंच पदी रेखा वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:12 IST2021-02-10T04:12:08+5:302021-02-10T04:12:08+5:30

भूकम ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी वाघ आणि आंग्रे यांचे दोनच अर्ज आल्यामुळे वेळेचा नियम पाळून निवडणूक निर्णय अधिकारी ...

Rekha Wagh as the Sarpanch of Bhukum | भुकूमच्या सरपंच पदी रेखा वाघ

भुकूमच्या सरपंच पदी रेखा वाघ

भूकम ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी वाघ आणि आंग्रे यांचे दोनच अर्ज आल्यामुळे वेळेचा नियम पाळून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ठीक दोन वाजता सरपंच व उपसरपंच पदाचा निकाल जाहीर केला.

या निवडीच्या वेळी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उज्ज्वला पवार, भागवत यादव, शरद बेलदार यांनी काम पाहिले. या निवडी दरम्यान अंकुश प्रकाश खाटपे,सुवर्णा सुभाष पानसरे,गौरी प्रसाद भरतवंश,सचिन बाळासाहेब हगवणे, निलेश जयसिंग ननवरे, सुवर्णा रामदास आंग्रे,मयुरी अभिलाष आमले या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे ही ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

यावेळी पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, पोलीस हवालदार नितीन गार्डी आणि गणेश साळुंके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

--

०९पिरंगुट भुकूम:

फोटो ओळ : भुकूम येथील सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामदैवताचे दर्शन घेताना

Web Title: Rekha Wagh as the Sarpanch of Bhukum