नाकारलेला मेडिक्लेम देण्याचा आदेश
By Admin | Updated: July 1, 2014 00:07 IST2014-07-01T00:07:05+5:302014-07-01T00:07:05+5:30
पूर्वीपासूनच हृदयविकाराचा आजार असल्याचे कारण देऊन मेडिक्लेम नाकारण्यात आलेल्या विमा कंपनीला 1 लाख 1क् हजार रुपये सहा आठवडय़ांत देण्याचा आदेश पुणो जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला.

नाकारलेला मेडिक्लेम देण्याचा आदेश
>पुणो : पूर्वीपासूनच हृदयविकाराचा आजार असल्याचे कारण देऊन मेडिक्लेम नाकारण्यात आलेल्या विमा कंपनीला 1 लाख 1क् हजार रुपये सहा आठवडय़ांत देण्याचा आदेश पुणो जिल्हा ग्राहक न्यायालयाने दिला.
कुमुद चिमणलाल शहा (रा. पर्वती) यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या पुणो शाखेविरुद्ध ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. शहा यांनी रिलायन्स कंपनीकडून 2क्क्6पासून मेडिक्लेम काढला होता.
शहा यांनी फेब्रुवारी 2क्12मध्ये जिल्हा ग्राहक न्यायालयात अॅड. लिखित गांधी यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. मागील 12-13 वर्षापासून त्या हृदयविकाराने त्रस्त आहेत व 1998मध्ये शहा यांची बायपास सजर्री झालेली होती. याची माहिती शहा यांनी मेडिक्लेम पॉलिसी काढताना कंपनीला सांगितलेली होती. त्यानंतरही कंपनीने त्यांचा विमा उतरविला होता. त्यामुळे कंपनीने प्रपोजल फॉर्म न्यायमंचात दाखल करावा, याची मागणी करूनही कंपनीने जाणीवपूर्वक प्रपोजल फॉर्म केला नाही. याकडे अॅड. गांधी यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
न्यायालयाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात व सदस्य गीता घाडगे यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणो ऐकून घेतल्यानंतर विमा कंपनीने शहा यांना खर्च झालेली रक्कम सहा आठवडय़ांच्या आत 1 लाख 1क् हजार रुपयांचा आदेश दिला. (प्रतिनिधी)
मेडिक्लेम हा 1 लाख रुपयांचा होता. जानेवारी 2क्11मध्ये शहा यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना पूना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. या काळात त्यांना अॅजिओप्लास्टी करावी लागली होती. त्यासाठी 1 लाख 75 हजार रुपये खर्च आला होता. मेडिक्लेमला कॅशलेस सुविधा असल्याने त्यांनी उपचाराच्या काळात हॉस्पिटलची फीची रक्कम भरण्याची आवश्यकता नव्हती. मात्र, कंपनीने फेटाळल्यामुळे शहा यांनी डिस्चार्ज घेतल्यानंतर कागदपत्रे सादर करून खर्चाची रक्कम विमा कंपनीकडे क्लेम केली होती; परंतु आजार पूर्वीपासूनच होता, या कारणावरून तो कंपनीने फेटाळून लावला.