डीएसके दाम्पत्याचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:58 IST2018-04-28T00:58:11+5:302018-04-28T00:58:11+5:30
सरकारी पक्षाने म्हणणे मांडण्यासाठी दोन दिवसांची वेळी मागितली होती.

डीएसके दाम्पत्याचा जामीन फेटाळला
पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे त्यांचा कोठडीत मुक्काम आता वाढणार आहे. डीएसके यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी बचाव पक्षातर्फे अॅड. श्रीकांत शिवदे यांनी युक्तिवाद केला. सरकारी पक्षाने म्हणणे मांडण्यासाठी दोन दिवसांची वेळी मागितली होती. गुरुवारी सरकारी पक्षाचे वतीने अॅड. प्रदीप चव्हाण यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकू न घेतले. त्यावर आज निर्णय दिला. डीएसकेंकडे ६ हजार ६७१ ठेविदारांनी ४४८ कोटी ७१ लाखांच्या ठेवी ठेवल्या आहेत.