कोरेगाव भीमा  दंगलीतील विस्थापितांचे पुण्यात पुनर्वसन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 08:46 PM2018-06-12T20:46:01+5:302018-06-12T20:46:01+5:30

एक जूनपासून ही दोन्ही विस्थापित कुटुंबे  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसली होती. अखेर त्यांचे पुनर्वसन करण्यात आले.

Rehabilitation of displaced persons in Koregaon Bhima riots in Pune | कोरेगाव भीमा  दंगलीतील विस्थापितांचे पुण्यात पुनर्वसन 

कोरेगाव भीमा  दंगलीतील विस्थापितांचे पुण्यात पुनर्वसन 

Next
ठळक मुद्देकोरेगाव भीमा  दंगलीतील विस्थापितांचे ११ महिन्यांकरिता पुण्यात पुनर्वसन  या कुटुंबांना लवकरात लवकर कायमस्वरूपी हक्काची घरे मिळण्यासाठी प्रयत्न करणार : डॉ धेंडे

पुणे : कोरेगाव भीमा दंगलीतील विस्थापित अशोक आठवले आणि सुरेश सकट यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन पुणे महानगर पालिकेच्या सदनिकेत मंगळवारी करण्यात आले आहे. याबाबत पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आदेश दिले. एक जूनपासून ही दोन्ही विस्थापित कुटुंबे  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसली होती. अखेर त्यांचे पुनर्वसन करण्यात आले.  पुणे महापालिकेचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्या हस्ते सदनिका देण्याच्या आदेशाचे पत्र कुटुंब प्रमुखांकडे देण्यात आले. या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस बाळासाहेब जानराव, शहर पदाधिकारी शैलेश चव्हाण, महिपाल वाघमारे, अशोक शिरोळे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी आठवले कुटुंबाने आपले धरणे आंदोलन थांबवल्याचे जाहीर केले.

   जानेवारी महिन्यात भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेत  सकट व आठवले कुटुंबाचे घर जळाले होते. परिणामी ही दोन्ही कुटुंबे बेघर झाली होती. दंगलग्रस्तांसमवेत त्यांना घरकुल देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, सध्या त्यांना कोणताही निवारा नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात निवारा उपलब्ध करून देण्यात आल्या . त्यानुसार पालिकेच्या सदनिकेत त्यांची व्यवस्था झाली आहे. पालिकेच्या चाळ विभागाकडील कसबा पेठेतील कॉलनी क्रमांक ५ मधील दोन सदनिका या दोन कुटुंबियांना दिल्या आहेत. या सदनिका ११ महिन्यांकरिता आहेत. सदरची दोन्ही कुटुंबे दंगलग्रस्त असल्याने त्यांच्याकडून प्रति महिना एक रुपया इतके भाडे आकारले जाणार असून, वीजबिल सदनिका धारकांनी भरायचे आहे, असे आदेशात नमूद केले आहे.याबाबत डॉ धेंडे यांनी समाधान व्यक्त केले असून या कुटुंबांना लवकरात लवकर कायमस्वरूपी हक्काची घरे मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: Rehabilitation of displaced persons in Koregaon Bhima riots in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.