खेड तालुक्यातील कोरोनाचा कहर, रेमिडिसिव्हर उपलब्ध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:10 IST2021-04-06T04:10:55+5:302021-04-06T04:10:55+5:30

कोरोनाच्या बाबतीत खेड तालुका हिटलिस्टवर असताना रेमडेसिव्हीर इंजेक्शन खेड तालुक्यात कोणत्याच औषध विक्रेत्याकडे अधिकृतरित्या उपलब्ध नाही. त्यातच महात्मा फुले ...

Rehabilitation of corona in Khed taluka, no remediver available | खेड तालुक्यातील कोरोनाचा कहर, रेमिडिसिव्हर उपलब्ध नाही

खेड तालुक्यातील कोरोनाचा कहर, रेमिडिसिव्हर उपलब्ध नाही

कोरोनाच्या बाबतीत खेड तालुका हिटलिस्टवर असताना रेमडेसिव्हीर इंजेक्शन खेड तालुक्यात कोणत्याच औषध विक्रेत्याकडे अधिकृतरित्या उपलब्ध नाही. त्यातच महात्मा फुले जन आरोग्य ही योजना कोणत्याही हाँस्पिटल प्रभावीपणे खेड तालुक्यात का राबवली जात नाही हे एक गौडबंगालच म्हणावे लागेल.

खेड तालुक्यात हे रेमिडिसिव्हर इंजेक्शन (माफक किंमतीत) मिळायला हवे. गेल्या कोरोना लाँकडाऊन काळात हेच औषध मिळवण्यासाठी अनेकांनी नाशिक,कोल्हापुर मुंबईत जाऊन ही औषधे आणावी लागल्याची डोळ्यासमोर उदाहरणे असताना शेजारच्या तालुक्यातील मेडीकलमध्ये रेमिडिसिव्हर औषध उपलब्ध आहे. खेड तालुक्यात एकाही मेडीकलमध्ये हे औषध उपलब्ध नसल्याचै आरोग्य विभागाने दिलेल्या रेमिडिसिव्हर औषधांच्या मेडीकल दुकानांच्या यादीवरुन दिसुन येत आहे. तालुक्यात आँक्सिजन बेडचे खाटा आता रुग्णांनी भरु लागल्या आहे. आरोग्य प्रशासनाने रेमिडिसिव्हर औषधे बाबत लक्ष देऊन वेळेत औषधे मिळण्यासाठी खुलासा करणे आवश्यक आहे.

याबाबत प्रांत विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की संबंधित रेमिडिसिव्हर औषध कंपनीचे खेड तालुक्यात डिस्ट्रूबिटर नसले तरी हे औषध कोणालाही विकण्यास अथवा विकत घेता येत नाही. कोविड रुग्णांवर ज्या ठिकाणी उपचार सुरु आहे तेच डाँक्टरांची शिफारस पत्र असेल तरच संबंधित औषध विक्रेता देऊ शकतो. तसेच पुणे पिपंरी परीसरात या रेमिडिसिव्हर औषधाचे स्टाँकिस्ट डिलर आहेत. शेजारील तालुक्यात जरी मेडीकलमध्ये हे औषधे मिळत असले तरी फक्त ज्या ठिकाणी कोविड रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या हाँस्पिटल मधील डाँक्टरांच्या शिफारसी नुसार संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना खरेदी करता येत असते. त्यामुळे खेड तालुक्यात मेडीकलमध्ये औषधे मिळत नसली तरी खाजगीत कोविड रुग्णांवर उपचार सुरु आहे ते डाँक्टरांच्या शिफारशी नुसार जिल्ह्यात रेमिडिसिव्हर ओषधे मिळतात ती ठिकाणे जिल्हा प्रशासनाने यादी जाहिर केलेली आहे.त्यामुळे रेमिडिसिव्हर औषधे अत्यावश्यकतेनुसार रुग्णांना उपलब्ध होत आहे.असा खुलासा केला

Web Title: Rehabilitation of corona in Khed taluka, no remediver available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.