शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

"आमचं पुनर्वसन शिवाजीनगर परिसरातच करा", कामगार पुतळा वसाहतीतील नागरिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 12:00 IST

दलित संघटनेच्या वतीने कामगार पुतळा चौकात ठिय्या आंदोलन

ठळक मुद्देबहुसंख्य लोकांची नोकरी, शिक्षण याच भागात सुरु

कामगार पुतळा वसाहतीत जवळपास ७० वर्षांपासून ४५०० नागरिक राहत आहेत. गेल्या १५ वर्षांपासून आम्ही पुनर्वसनासाठी लढा देत आहोत. आमच्या मुलांचे शिक्षण, लोकांची नोकरी शिवाजीनगर भागातच चालू आहे. त्यामुळे पुनर्वसन येथून २ किलोमीटरच्या आत शिवाजीनगरलाच करावं. अशी मागणी कामगार पुतळा वसाहतीतील नागरिकांनी केली आहे..

कामगार पुतळा झोपडपट्टी बचाव समिती, पुणे शहर,व  पुणे शहरातील विविध सतरा दलित संघटनेच्या वतीने कामगार पुतळा चौक याठिकाणी समितीच्या अध्यक्षा बायडाबाई पवार, उपाध्यक्षा सखुबाई डेंगळे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नागरिकांनी मागणी केली आहे. 

पालकमंत्री अजित पवार यांचा आदेश म्हणून पुणे महानगरपालिका व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे महामेट्रो प्रकल्पाचे उभारणीसाठी पुनर्वसनाचा निर्णय घेतला होता. पण येथील नागरिकांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता त्यांचे परस्पर पुनर्वसन विमान नगर व हडपसर या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या प्रकल्पात करण्यात आले. त्याविरोधात आंदोलन करत दलित संघटनांनी आवाज उठवला आहे. यावेळी समितीच्या अध्यक्षा म्हणाल्या बायडाबाई पवार म्हणाल्या की, आमची पिढीही गेल्या सत्तर वर्षांपासून येथे वास्तव्यास आहेत. महापालिकेला मेट्रो प्रकल्पासाठी पुनर्वसन करायचं आहे. या गोष्टीला आमचा अजिबात विरोध नाही. पण ते शिवाजीनगर भागात दोन किलोमीटरच्या अंतरात असावे. येथील नागरिकांना कुठल्याच बाबतीत अडचणी येणार नाहीत. येथील बहुसंख्य लोक कामगार असून मुलांचे शिक्षण देखील येथे सुरू आहे, शिवाजीनगर परिसरात अनेक शासकीय जमिनी असून त्याबद्दल सर्व माहिती व त्या जमिनीची कागदपत्रे आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना दाखवली सुद्धा आहे.  

याबाबत हमीद शेख म्हणाले,  आमच्या व्यथा आम्ही ३१मार्चला महामेट्रो व्यवस्थापक ब्रिजेश दिक्षित यांना देखील मुंबई जाऊन सांगितल्या होत्या.  त्यावर त्यांनी पालकमंत्री अजितदादा यांनी जर असा आदेश काढला आहे. तर आमची काहीच हरकत नाही, तेव्हा पुनर्वसनाचा खर्च पुणे महामेट्रो व पीएमआरडीए करायला तयार आहे. असे सांगण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाshivajinagar-acशिवाजीनगर