शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

भोगवटापत्र न घेतलेली बांधकामे नियमित?

By admin | Updated: February 19, 2016 01:37 IST

बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याची तपासणी करून भोगवटापत्र न घेता त्याचा वापर सुरू केलेल्या बिल्डरांना केवळ तडजोड फी आकारून त्यांची सर्व बांधकामे नियमित करण्यास

पुणे : बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याची तपासणी करून भोगवटापत्र न घेता त्याचा वापर सुरू केलेल्या बिल्डरांना केवळ तडजोड फी आकारून त्यांची सर्व बांधकामे नियमित करण्यास महापालिकेच्या मुख्यसभेने गुरुवारी मंजुरी दिली. यामुळे अनेक अनियमित बांधकामांची दंडात्मक कारवाईतून सुटका होणार असल्याने महापालिकेला एक हजार कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याची टीका मुख्यसभेत सभासदांनी केली.बांधकाम प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रकल्पाचे भोगवटा प्रमाणपत्र बांधकाम व्यावसायिकाने महापालिकेकडून घेणे बंधनकारक आहे. भोगवटा प्रमाणपत्र घेतल्याशिवाय त्यांना सदनिकांचे हस्तांतरण करता येत नाही. मात्र, अनेक बांधकाम व्यावसायिकांनी भोगवटा प्रमाणपत्र न घेताच परस्पर सदनिकांची विक्री केलेली आहे. त्या प्रकल्पाला अनेक सेवासुविधा न पुरविताच त्यांनी सर्व सदनिका विकून आपली जबाबदारी झटकली आहे. बांधकाम व्यावसायिकांची या त्रासातून सुटका करण्यासाठी महापालिकेच्या वतीने खास सवलत देण्याचा प्रस्ताव गुरुवारी मंजूर करण्यात आला आहे.सभागृह नेते बंडू केमसे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, नगरसेवक रवींद्र धंगेकर, हेमंत रासने व पृथ्वीराज सुतार या सर्वपक्षीय नगरसेवकांनी हा प्रस्ताव नोव्हेंबर २०१४ मध्ये मांडला होता. बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी हा प्रस्ताव आणल्याची मोठ्याप्रमाणात टीका झाल्याने प्रत्येक महिन्यात हा प्रस्ताव पुढे ढकलला जात होता. गुरुवारी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस या पक्षांनी एकत्र येऊन हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. उपमहापौर आबा बागूल, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, अप्पा रेणुसे, वसंत मोरे, रूपाली पाटील यांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला.शहरामध्ये भोगवटा प्रमाणपत्र न घेता बांधकाम केल्यास त्याला एकूण बांधकाम प्रकल्पाच्या २० टक्के इतकी रक्कम दंड म्हणून आकारली जाते. याविरोधात बांधकाम व्यावसायिकांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना यावर निर्णय घेता येतो का, याची विचारणा सदस्यांनी केली. याबाबत विधी विभागाच्या अ‍ॅड. निशा चव्हाण यांनी सांगितले की, ‘उच्च न्यायालयामध्ये यासंदर्भात २ याचिका दाखल झाल्या आहेत. संबंधितांविरुद्ध सक्त कारवाई करू नये, अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.’प्रस्तावाला मनसेकडून विरोध झाल्याने, तो मतदानाला टाकण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपने एकत्र येऊन ५८ विरुद्ध २० मतांनी हा प्रस्ताव मंजूर करून घेतला.