दुय्यम निबंधक कार्यालय व ग्रामपंचायत समोर नियमित वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:17 IST2021-03-04T04:17:13+5:302021-03-04T04:17:13+5:30
हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकासमोर दुय्यम निबंधक कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय असल्याने शिरूरच्या निम्म्या गावातील व स्थानिक ...

दुय्यम निबंधक कार्यालय व ग्रामपंचायत समोर नियमित वाहतूककोंडी
हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकासमोर दुय्यम निबंधक कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालय असल्याने शिरूरच्या निम्म्या गावातील व स्थानिक ग्रामस्थ कामानिमित्त येथे मोठ्या प्रमाणात येतात.येथे वाहनतळ नसल्याने येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकाच्या प्रवेशद्वारासमोर नागरिक दुतर्फा रस्त्यालगतच बेसिस्त पद्धतीने दुचाकी व फोर व्हीलर वाहने रस्त्याच्या बाजूला उभी करत असल्याने वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे.गेल्या अनेक वर्षापासून वाहतूककोंडीचा प्रश्न सुटत नाही.या परिसरात वाहतूक पोलीस कायमस्वरूपी आवश्यक आहे.पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती केल्यानंतर वाहतूककोंडीला दररोज सामोरे जाण्याची ग्रामस्थांवर वेळ येणार नाही.सध्या वाहनचालकांना तसेच कामानिमित्त आलेल्या नागरिकांना या रस्त्याने ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागतो व वेळही खर्च होतो.काही व्यवसायिकांची दुकानेही रस्त्यालगत असल्याने ग्राहकांनी दुचाकी व फोरव्हीलर दुकानाबाहेर उभी केल्याने त्याचा परिणाम वाहतूककोंडीवर होतो.वाहतूककोंडीची समस्या गेल्या अनेक वर्षापासून असतानाही पोलीस आणि ग्रामपंचायत यांच्यात या विषयावर समन्वय बैठक झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत नाही.
तळेगाव ढमढेरे येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर रस्त्यावर झालेली वाहतूककोंडी.